देशाप्रती प्रेम, आदर असावा - हर्षवर्धन पाटील

0 झुंजार झेप न्युज

• पिंपरी चिंचवड विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पिंपरी,पुणे,दि.16: आज देश ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, आर्थिक क्षेत्रा मध्ये मोठी प्रगती केली आहे. मागील नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रगतीचा आलेख उंचावला आहे. लवकरच भारत महासत्ता होईल. पंतप्रधान मोदी यांची देशाप्रती निष्ठा पाहता, त्यांचे अनुकरण करत, आपले दैनंदिन कार्य करताना विद्यार्थी, नागरिकांनी देशाप्रती प्रेम आदरभाव जपला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.     

पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या साते, मावळ येथील मुख्यालयात स्वातंत्र्य दिना निमित्त हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले. पीसीयुच्या शैक्षणिक सत्राचे पहिले वर्ष सुरू झाले आहे. यावेळी पाटील यांनी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांना शैक्षणिक सत्रास व स्वातंत्र्य दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पीसीयुचे कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, उप कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, प्रशासकीय मंडळ सदस्य डॉ. पंडित विद्यासागर, कुलसचिव डॉ. डी. एन. सिंग, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते. यावेळी देशासह परदेशातून आलेले प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत मोलाचे योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

पाटील म्हणाले की, माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांनी १९९० मध्ये सुरू केलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. पीसीईटीच्या शैक्षणिक संस्थां मधून व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, तंत्रनिकेतन आणि विविध विषयांचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय अशा शैक्षणिक अभ्यासक्रमांची अद्ययावत व्यवस्था आकुर्डी, रावेत, तळेगाव परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील आणि पद्माताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी क्लब हाऊस, योगा सेंटर, अभ्यासिका, वायफाय - इंटरनेट सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा बसविण्यात आली आहे. वसतिगृहात सहाशे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पीसीयु, साते, मावळ येथे जाण्या-येण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पीसीयु विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना महाराष्ट्रासह विविध राज्यांतील तसेच परदेशातील नायजेरिया, युएई, बांगलादेश, नेपाळ, भूतान आदी देशांमधील आतापर्यंत एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, असे पद्माताई भोसले म्हणाल्या.   

सूत्रसंचालन डॉ. सोनिया वर्मा यांनी केले. आभार डॉ. राजीव भारद्वाज यांनी मानले. कार्यक्रमास विविध शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.