विहामांडवा येथील किसान मशनरी स्टोअर्स फोडणारे सराईत आरोपीची आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद
विहामांडवा, दि.26 (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): पैठण तालुक्यातील विहामांडवा-येथील घटना, फिर्यादी नामे प्रमोद पन्हाळकर रा.विहामांडवा यांनी पोलिस स्टेशन पाचोड येथे फिर्याद दिली की, दि.१८/८/२३ रोजीच्या रात्री ०८:००वाजे पासुन ते दि.१९/०८/२३ रोजीचे सकाळी ०५:०० वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी किसान मशनरी स्टोअर्स चे शटर तोडुन दुकनातील सबमर्सिबल मोटर काॅपर वायर,मोनोब्लाक मोटार काॅपर वायर ,मोटार बुश असा मुद्दे माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेलेबाबत तक्रारीवरुन पो.स्टे.पाचोडयेथे गुन्हा झाला होता.
त्या अनुशंगाने सदर गुन्ह्याचा मा.मनिष कलवानिया पो.अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण यांच्या आदेशान्वे स्थानीय गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असतांना पो.निरिक्षक सतिष वाघ यांना गुप्त बातमिदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्हा हा सराईत गुन्हेगार टोळीतील आरोपी नामे १) मोहशीन खान नदिर खान (२६) रा.महेबुबनगर ता.जि.अमरावती २)चेतन सुकलाल ठाकरे (२५) रा.मंगरुळदस्तगिर ता.धामणगाव ,रेल्वे जि.अमरावती यांनी त्यांच्या ईतर साथिदारासोबत मिळुन केला आहे नमुद बातमी वरुन त्यांनी तात्काळ स्थानीय गुन्हे शाखेचे पथक तयार करुन शोथार्थ रवाना केले पथकातील पो.उ.पानि.मधुकर मोरे यांना गुप्त बातमिदारा मार्फत खात्रीशीर माहितीचे ठिकाणी ज्यामधे जालना,पुसद,कारंजा, अमरावती, नांदगांव खंडेश्वर येथे सतत तिन दिवस अहोरात्र आरोपीचा पाठलाग करुन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे १)मोहशीन खान नदिर खान २) चेतन सुकलाल ठाकरे मिळुन आले त्यांना सदरील गुन्ह्या विषयी व ईतर साथिदाराबाबत विश्वासात घेउन विचार पुस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार नामे ३) सोहेल बासेद जुला (२८) रा.डिग्रस जि.यवतमाळ मुळ रा.मोमीनपुरा बीड यांच्या व ईतर साथिदारासोबत करुन गुन्ह्यातील चोरलेला मुद्दे माल हा आरोपी ४) अस्लमखा गुलाबखा पठाण (४२)रा.मधुकरनगर पुसद जि.यवतमाळ भंगार व्यापारी यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने सदर आरोपीचा दिलेल्या पत्यावर शोध घेतला असता तो मिळुन आला त्याला सदर गुन्ह्यातील मुद्दे मालाबाबत चौकीशी केली असता त्याने ही गुन्ह्यातील मुद्दे माल हा जास्त रकमेला आरोपी ५) शेख शकिल शेख हफिज (३२) रा.नांदगाव खंडेश्वर जि.अमराती यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने त्यांच्या राहत्या पत्यावर शोध घेतला असता तो मिळुन आला नमुद आरोपीतांना सदरील गुन्ह्यासंबधी विश्वासात घेउन विचार पुस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी १) याने व आरोपी ३) याने ईतर आरोपीतांना गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने त्यांच्या ताब्यातुन विना क्रमांकाची इंडिका व्हिस्टा कार,व आरोपी क्रं.३) याच्या ताब्यातुन गुन्ह्यात वापरलेली टोयाटो ईनोव्हा कार MH 27 AC 9060 असे मिळुन आले तसेच दोन्ही वाहनामधे गुन्हे करण्यासाठी वापरलेली साहित्य लोखंडी सब्बल, लोखंडी कैची, लोखंडी पक्कड,शटर कट करण्यासाठी वापरण्यात येणारे कटर असे साहित्य मोबाइल हैंडसेट ,नगदी रुपये पाच हजार असा एकुन ५,४५,७००रु चा मुद्दे माल जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपींना पुढिल कायदे शीर कारवाही कामी पाचोड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.
आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी जिल्ह्या सह ईतर जिल्ह्यात घरफोडीचे अनेक गुन्हे केले शक्यता आहे नमुद गुन्ह्यातील आरोपीतांना ईतर साथीदाराबाबत अधिक तपास सुरु आहे,सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया,अप्पर पो.अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.सतिष वाघ सपोनि सुधिर मोटे,पो उपनिरीक्षक मधुकर मोरे, पोलिस सहाय्यक फौजदार लहू थोटे,पोलिस हवालदार कासिम शेख, पो हवालदार रवी लोखंडे,पो हवालदार विठ्ठल डोके, पो अंमलदार योगेश तरमाळे , आनंद घाटेश्वर ,पो अंमलदार राहुल गायकवाड,चालक पो शिपाई संजय तांदळे, यांनी केली आहे, व पुढिल कायदेशीर कारवाही कामी पाचोड पोलीस स्टेशन येथे आरोपींना हजर करण्यात आले असून पुढील तपास पाचोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक नितिन काकरवाल,पो जमादार किशोर शिंदे,पो जमादार ताराचंद घडे,पो जमादार रामेश्वर तळपे करत आहेत,

