ज्ञानोबा कदम यांच्या सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

0 झुंजार झेप न्युज

ज्ञानोबा कदम यांच्या सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

पिंपरी चिंचवड,दि.29: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील मुकादम माननीय श्री मुकुंद ज्ञानोबा कदम यांच्या सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम व सर्व कर्मचाऱ्यांना स्नेहभोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आरोग्य विभागात मुकादम या पदावर असलेले माननीय श्री मुकुंद ज्ञानोबा कदम हे आज वयाच्या 60 व्या वर्षी सेवा निवृत्त झाले.कदम भाऊसाहेबांनी महापालिकेमध्ये त्यांच्या आयुष्यातील 39 वर्ष महापालिकेची सेवा केलेली आहे. 1984 साली महापालिकेच्या उद्यान विभागातून रोजंदारी तत्त्वावर सेवेची सुरुवात झाली.16 जानेवारी 1986 ला परमनंट झाले सात वर्ष उद्यान विभागात सेवा केली

1991 ते 2014 अशी २३ वर्षे अतिक्रमण विभागात सेवा केली 2014 ते 2015 हे एक वर्ष पाणीपुरवठा विभागात सेवा केली नंतर 2015 ते सप्टेंबर2023 अशी आठ वर्ष त्यांनी आरोग्य विभागात मुकादम पदावर सेवा केली

त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला महापालिकेतील कर्मचारी अधिकारी सुधीर वायदंडे, अविष्कार डोळस ,चंद्रकांत लवळे ,सुरज चंडालिया ,कैलास दुराफे, एजी ग्रुपचे दाऊलभाई दीपक आढाव अभिमान रणसुरे कार्तिक आयरे नवनीत कुमार नरसिंग जाधव मौला शेख सत्वशीला पोतेकर पवन मिसाळ अजय खोकर अमोल साबळे तसेच अनेक महिला कर्मचारी उपस्थित होते सर्व कर्मचाऱ्यांनी दुःखद अंतकरणाने कदम भाऊ साहेबांना निरोप दिला व पुढील काळात चांगले समाज कार्य व्हावे याच्या शुभेच्छा दिल्या.

मराठवाडा फुले शाहू आंबेडकर कला प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , पत्रकार तथा भिमशाहिर कवी गायक व एजी ग्रुप चे सफाई मित्र माननीय अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी कदम भाऊ साहेबांच्या सेवेबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी केले कदम भाऊसाहेबांनी सेवा निवृत्ती निमित्त सर्व कर्मचाऱ्यांना भोजनदान दिले.दीपक आढाव यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.