पुणे येथे कोणीतरी 3 अज्ञात इसमांनी येऊन लॅब मध्ये तोडफोड केली

0 झुंजार झेप न्युज

पुणे येथे कोणीतरी 3 अज्ञात इसमांनी येऊन लॅब मध्ये तोडफोड केली

पुणे,दि.27: दिनांक 23/10/2023 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पूना डाईग्नोस्टीक सेंटर, सोमजी, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे कोणीतरी 3 अज्ञात इसमांनी येऊन लॅब मध्ये तोडफोड केली तसेच तपासणी साठी आलेले सुरेश मोतीलाल सहा यांना कोयत्याने मारहाण केली म्हणून कोंढवा पोलिस येथे 1091/2023 भा द वी गुन्हा 326,506,427,34 ,महा पोलिस आधी कलम 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला गेला. मा.वरिष्ठांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता पोलिस हवा अमोल हिरवे, पोलिस अम शशांक खाडे यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी खडी मशीन चौक येथे येणार असेल बाबत माहिती मिळाल्याने तेथे जाऊन आरोपी 1) आशिष सुरेश दुधनिकर वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे 2) धीरज लहू धेले वय 19 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे 3) अक्षय प्रताप निकम वय 24 रा गोकुळ नगर कोंढवा पुणे यांना गुन्हा दाखल नंतर अवघ्या 2 तासात हत्यारासह ताब्यात घेऊन त्यांना पोलिस स्टेशन येथे आणले असता त्यांनी लॅब व्यवसायाचे कारणावरून सदर गुन्हा केल्याचे कबूल केले.

सदर कामगिरी मा. रितेश कुमार पोलिस आयुक्त,मा. संदीप कर्णिक पोलिस सह आयुक्त, मा.रंजन कुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.विक्रांत देशमुख पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. शाहूराजे साळवे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, मा.संदीप भोसले, पोलिस निरीक्षक गुन्हे, मा. संजय मोगले पोलिस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे, पो हवा अमोल हिरवे, पो अम वंजारी,पो अम रत्नपारखी, पो अम रासगे, पो अम मरगळे,पो अम भोसले, पो अम पाटील,पो अम गरुड,पो अम मोरे, पो अम थोरात, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.