पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शिर्डीत काळे झेंडे दाखवणार -काळभोर

0 झुंजार झेप न्युज

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शिर्डीत काळे झेंडे दाखवणार -काळभोर

पिंपरी चिंचवड,दि.25: शहरातील निगडी तळवडे रावेत किवळे बोपखेल कासारवाडी फुगेवाडी दापोडी दिघी बोपखेल पिंपरी भोसरी गावांमध्ये रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र २००० याड क्षेत्र कमी करुन ५०० मीटर करण्यात यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुणे जिल्हाधिकारी साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना लेखी पत्राद्वारे रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शिर्डी दौऱ्यावर येत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार असून अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब ह्यांना ईमेल आयडी वर तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना तक्रार दाखल केली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.