आरोपीत त्यांच्याकडून चोरीची 1 चारचाकी 1 दुचाकी मोटरसायकल व 2 मोबाईल हस्तगत
पिंपरी चिंचवड,दि.03: कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर शहर गुरन.1102/2023 भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. मा.वरिष्ठांनी दाखल गुन्हायातील आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले असता. सदर गुन्ह्यातील आरोपी युसुफ वजीर शेख हा आश्रफ नगर येथे त्याच्या राहते घरातील लोकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस *अंमलदार* *विकास मरगळे व सुहास मोरे* यांना प्राप्त झाली होती. सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाची शिंदे तपास पथकातील अंमलदार अमोल हिरवे राहुल वंजारी , जयदेव भोसले , राहुल थोरात,राहुल राजगे ,अभिजीत रत्नपारखी, आशिष गरुड , सुहास मोरे, रोहित पाटील, शशांक खाडे ,विकास मरगळे असे आलिफ टॉवरच्या बाजूला मोकळ्या मैदानात सोबतच्या पोलीस स्टाफच्यासह सापळा रचून थांबलो असता आरोपी हा १८:०० वा. सुमारास घरातील लोकांना भेटण्यासाठी येणार असल्याबाबत बातमीदारांनी कळविल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता युसुफ वजीर शेख वय 23 वर्षे राहणार अश्रफ नगर गौसरवरा मस्जिद समोर गल्ली नंबर ७ न्यू ग्रीन बिल्डींग मध्ये कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले. सदर आरोपी या स्थापत घेऊन दाखल गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कोंढवा पोलीस ठाणे पुणे
१) गुरनं.११०२/२०२३ भादवि कलम 380
२)गुरनं.११०५/२०२३ भादवी कलम 379
३) गुरनं. १०७७/२०२३ भादवि कलम 379
वरील प्रमाणे आरोपी आणि गुन्हा केल्याचे उघड करून वरील प्रमाणे कारवाई मा. रितेश कुमार सो,पोलीस आयुक्त ,मा.संदीप कर्णिक सो,सहा.पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा सो.अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, मा.विक्रम देशमुख पोलीस उपयुक्त परि ०५ , मा. शाहू राजे साळवे सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.संदीप भोसले पोलीस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

