आगामी लोकसभा निवडणूक ठरवणार धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य - डॉ. कुमार सप्तर्षी
निगडी प्राधिकरण (प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) :पुणे विक्रमी चारशेव्या व्याख्यानमालेत झाले प्रभावी विचारमंथन.व्याख्यानमाला हा वैचारिक मंथनासाठी उपयुक्त उपक्रम आहे. त्यासाठी अनेक संस्था प्रयत्नशील असतात. सलग ४०० व्याख्याने आयोजित करण्याचे काम हा विक्रमच म्हणावा लागेल. असा कार्यक्रम पुण्यात नुकताच पार पडला. ४०० वे व्याख्यान पुष्प गुंफले गेले. दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा विक्रमी कार्यक्रम पार पडला.
'सद्यस्थिती : आव्हाने व कर्तव्य' या विषयावर डॉ. कुमार सप्तर्षी ( संस्थापक, युवक क्रांती दल आणि अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य सेना आणि सोशलिस्ट पार्टीचे प्रमुख डॉ. अभिजीत वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, हॉटेल दुर्वांकूर समोर, टिळक रोड, पुणे येथे व्याख्यान झाले. सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव हे हजर होते. दलित स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समविचारी कार्यकर्ते व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.


