बिरसा मुंडा यांचे कार्य व विचार वाडी-तांड्यापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज- गुणवंत मिसलवाड

0 झुंजार झेप न्युज

बिरसा मुंडा यांचे कार्य व विचार वाडी-तांड्यापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज- गुणवंत मिसलवाड

नांदेड,दि.16: जल, जंगल, जमीन ही मूळ आदिवासींची मालमत्ता असताना १८ व्या शतकात ब्रिटीशांनी व फितूरी सावकारांनी आदिवासी अनुसूचित जमातीवर अन्याय केला. याचा बदला म्हणून बिरसा मुंडा यांनी उलगुलान या आंदोलनाच्या माध्यमातून देशातील तमाम आदिवासी अनुसूचित जमातींना जमीन कास्त करण्यासाठी परत मिळवून देऊन ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडणारा महान क्रांतीकारक बिरसा मुंडा यांचे कार्य आणि विचार वाडी-तांड्यावरील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे ही काळाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.

ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. १५ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता आदिवासी समाज क्रांतीचे जनक, धरतीआबा, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

पुढे बोलताना आपल्या भाषणात ते म्हणाले की, बिरसा मुंडा यांचे जीवन चरित्र युवा पिढीने आत्मसात करुन त्यांचा आदर्श घेऊन समाजाप्रती, देशाप्रती तुम्ही- आम्ही सर्वचजण कार्य करावे असेही ते यावेळी म्हणाले. सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा.श्री. अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, वाहतुक निरीक्षक ओमप्रकाश इंगोले, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहर माळगे, संभाजी जोगदंड, वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे, कमलकिशोर बियाणी, सुरेश फुलारी, गजानन टोणगे, रऊफभाई, गुलाम रब्बानी, तिरुपती लुंगारे, सौ. रेखा माचीनवार, शिल्पा ढवळे, योगेश्‍वरी सुवर्णकार, संदीप देशमुख, पांडूरंग बुरकुले, पवन पटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आगारातील कामगार- कर्मचारी, बंधु- भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.