केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर पुन्हा भिमगर्जना करणार

0 झुंजार झेप न्युज

विचारवंताच्या बैठकीत पुन्हा भारतीय दलित पँथर सुरु करण्याचा एकमताने निर्णय 

पुणे,दि.02: लोणावळा वळवं व्हिलेज रिसॉर्ट येते रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यीक, पत्रकारांशी आणि निवडक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचार विनीमय करणारा वैचारिक संवाद केला. या वैचारिक संवादात चालु राजकीय घडामोंडीवर साधक वादक चर्चा झाली. या बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडीत रिपब्लिकन पक्षाची भविष्यातील वाटचाल काय असेल यावर विचार मंथन करण्यात आले. त्यात सर्व विचारवंत, साहित्यीक, पत्रकार आणि कार्यकर्त्यानी सामाजिक संघटना म्हणून रिपब्लिकन पक्षांशी संलग्न असणा-या सामजिक संघटनेची स्थापना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.  

ज्या दलित पँथरच्या चळवळीतुन रामदास आठवलेंचे नेतृत्व उभे राहिले त्या भारतीय दलित पँथरची पुर्नस्थापना करावी अशी या बैठकीत सर्वसंमतीने सुचना मंजुर झाली. त्यामुळे आगामी काळात ना. रामदास आठवले यांची भारतीय दलित पँथर ही पुन्हा एकदा भिमगर्जना करेल. आणि भारतीय दलित पँथरचे एक वादळ पुन्हा नव तरुणांमध्ये घोंगावतांना दिसेल. अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.  

 1970 च्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली. दलित पॅथर राजा ढाले यांनी विसर्जित केल्यानंतर रामदास आठवले यांच्या पुढाकारात भारतीय दलित पॅंथरचे संगठन उभे राहिले. आणि ते देशभर भारतीय दलित पँथर रामदास आठवले यांच्या नेतृत्वात वादळासारखे घोंगावत राहिले. दलितांच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी प्रचंड मोठे आंदोलने केली. एक आक्रमक कृतीशील सामाजिक संघटन म्हणून भारतीय दलित पँथरचे देशभरातील दलितांचा विश्वास संपादित केला. त्या विश्वासावर रामदास आठवले यांच्यातला पँथर भिमगर्जना करीत देशभर आणि जगभर यांचे नेतृत्व पोहचले.  

आता पुन्हा ना. रामदास आठवले हे पँथरच्या आवेशात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात भिमगर्जना करणार आहेत. त्यामुळे नव्या पिढीच्या हाती भारतीय दलित पँथरच क्रांतीकारी आक्रमक संघटन ते सोपणार आहेत.ना. रामदास आठवले यांच्यातला पँथर पुन्हा अन्याय अत्याचारांवर झेप घेणार आहे. अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर, मावळ तालुका पुणे जिल्हाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर मा.रामदासजी आठवले साहेब यांची दि वर्ल्ड बुद्धिस्ट संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्धल भव्य नागरी स्वागत करण्यात आला , या बैठकीला विचारवंत साहित्यीक शरणकुमार लिंबाळे, अँड. दिलीप काकडे, वरिष्ठ पत्रकार राजा अदाटे रिपाइंचे अविनाश महातेकर, आजचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, गौतम सोनवणे, बाबुराव कदम, पप्पू कागदे; दिलीप जगताप; परशुराम वाडेकर, या बैठकीचे उत्कृष्ठ नियोजन पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी केले यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार ,पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड,तालुका अध्यक्ष नारायण भालेराव,लोणावळा शहर अध्यक्ष कमलशिल आनंद म्हस्के, मावळ तालुका कार्याध्यक्ष अशोक सरवते, तुफेल शेक ,यमुना साळवे,म्लान बनसोडे,अंकुश सोनवणे,राजू देसाई, रोहिने देसाई,जयराम कदम,महिंद्र देसाई,रमेश भालेराव,नंदू शेळके,कुशल वाघमारे,पंकज देसाई,मनोज भालेराव कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.