अमरधाम स्मशान भूमी विद्युत दाहिनी सुरू करण्यात यावी म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

0 झुंजार झेप न्युज

 निगडी अमरधाम स्मशान भूमी ह्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड, दि.17: निगडी येथील अमरधाम स्मशान भूमी ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी नवीन विद्युत दाहिनी काम संपुर्ण केले असून फक्त राजकीय नेते मंडळी ह्यांच्या उपस्थितीत नवीन विद्युत दाहिनी उद्घाटन कार्यक्रमाला नेते मंडळी उपस्थित राहत नाही म्हणून तसेच राजकीय नेते नवीन विद्युत दाहिनी सुरू करण्यासाठी वेळ देत नाही म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी निगडी येथील नवीन विद्युत दाहिनी सुरू केली नाही त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी अडचण येत असून जुन्या विद्युत दाहिनी कॉईल खराब झाली असून जुनी विद्युत दाहिनी नादुरुस्त अवस्थेत आहे.

जुनी विद्युत दाहिनी २० वर्ष जुनी असून तिची क्षमता कमी प्रमाणात आहे एक अंत्यविधी करण्यासाठी दिड ते दोन तास कालावधी लागत असून काही वेळा जुनी विद्युत दाहिनी संपूर्ण गरम झाल्यावर थंड होण्यासाठी खुप वेळ प्रतिक्षा करावी लागत असते त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी निगडी येथील अमरधाम स्मशान भूमी ह्या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून नवीन विद्युत दाहिनी काम संपुर्ण केले असून फक्त राजकीय नेते मंडळी ह्यांच्या उपस्थितीत नवीन विद्युत दाहिनी उद्घाटन कार्यक्रम करण्यासाठी मुद्दाम पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन नवीन विद्युत दाहिनी सुरू करत नाही म्हणून निगडी येथील स्मशानभूमीत दिनांक २१/६/२०२४ रोज नवीन विद्युत दाहिनी सुरू करण्यात यावी म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून त्या ठिकाणी रोज दहा ते पंधरा मयताच्या अंत्यविधी करण्यासाठी या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत आहेत निगडी गावठाण यमुना नगर त्रिवेणी नगर दुर्गा नगर अजंठा नगर तळवडे गावठाण रूपी नगर पाटिल नगर दत्तवाडी आकुर्डी निगडी प्राधिकरण सहयोग नगर टावर लाईन शरद नगर वृंदावन तसेच आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक निगडी स्मशान भूमी ह्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून त्या ठिकाणी जुनी विद्युत दाहिनी नादुरुस्त अवस्थेत असल्याने नवीन विद्युत दाहिनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी संपूर्ण काम केले असून फक्त राजकीय नेते मंडळी नवीन विद्युत दाहिनी उद्घाटन कार्यक्रमाला वेळ देत नाही.

म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी नवीन विद्युत दाहिनी सुरू केली नाही म्हणून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून त्या संदर्भात निगडी अमरधाम स्मशान भूमी ह्या ठिकाणी दिनांक २१/६/२०२४ रोज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई करण्यात यावी. हि नम्र विनंती सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.