राजधानीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
नवी दिल्ली,दि.01: साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.कॉपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय केंद्रीय नागरी उड्डयन व सहकारिता राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून नम्र अभिवादन केले. यावेळी अनेक खासदार उपस्थित होते.
खासदार श्रीमती मेधा कुलकर्णी, धैर्यशील माने, यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनच्या अपर निवासी आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

