दहावीतील मुलाची आत्महत्या पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितल्याने संपवले जीवन
पिंपरी चिंचवड,दि.02: पालकांना शाळेत घेऊन ये अर्पित दुबे मात्र, तो घरी गेलाच असे शिक्षकांनी सांगितले. त्यानंतर दहावीतील विद्यार्थी शाळेतून निघाला. नाही. चार दिवसानंतर त्याचा मृतदेह मुळा-मुठा नदीपात्रात आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पिंपरी चिंचवड येथील रुपीनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
अर्पित सूर्यकांत दुबे (वय १५, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पित हा
'सीसीटीव्ही मध्ये कैद'
अर्पित हा शाळेतून बाहेर पडल्यानंतर एका रिक्षाने भक्तीशक्ती चौकात आल्याचे सीसीटीव्ही कैमेचाच्या फुटेजवरून समोर आले. मात्र, तेथून तो कुठे गेला याचा शोध पोलिसाकडून सुरू होता.
रुपीनगर येथील ज्ञानदीप इंग्लिश पोलिस ठाण्यात धाव त्यानुसार अर्पित अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मीडियम स्कूल या शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. तो २७ जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला, त्यावेळी काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना शाळेत घेऊन येण्याबाबत शिक्षकांनी सांगितले. त्यात अर्पित याला देखील पालकांना शाळेत घेऊन येण्याबाबत सांगण्यात आले. इतर विद्यार्थी पालकांना घेऊन शाळेत पोहोचले. मात्र, अर्पित शाळेत परतला नाही. त्यामुळे शिक्षकानी त्याच्या पालकांशी संपर्क साधला. तो घरी पोहोचला नसल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर पालकांनी चिखली
दरम्यान, अर्पित याचा शोध सुरू असताना गुरुवारी (दि. १) सकाळी अकराच्या सुमारास लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत खराडी येथील पंचशील टॉवरजवळ मुळा-मुठा नदीपात्रात एक मृतदेह आढळून आला. त्यावरून लोणीकंद पोलिसांनी चिखली पोलिसांशी संपर्क साधला. मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आला. मृतदेह अर्पित याचाच असल्याचे समोर आले.

