आघाडी धर्माचा पालन होत नाही : सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड,दि.28: येत्या एक दोन महिन्यांत निवडणूक होणार असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील एकनाथ शिंदे शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर ह्याचे शहरातील अंतर्गत वादविवाद सुरू असून त्या मुळे जाहिरात बाजी सुरू असून वर्तमान पत्र सोशल मीडिया वर राजकीय नेते देवेंद्र फडणवीस साहेब अमित भाई शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप आमदार अश्विनी ताई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी विधानसभा आमदार आण्णा बनसोडे ह्याचे खासदार बारणे ह्याची केंद्रीय स्थायी समिती अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्या जाहिराती मध्ये फोटो गायब झाले असून त्या मुळे पिंपरी चिंचवड शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रतिक्रया :
चिंचवड विधानसभा आमदार अश्विनी ताई जगताप व शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांच्या विषयी आघाडी धर्मात द्वेष का करण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते ह्यांनी विलक्षण करण्यात यावे शहर अध्यक्ष हा पक्षांचा प्रमुख नेता असतो त्याचा सन्मान करण्यात यावा आघाडी धर्माचा पालन करण्यात यावे.
-सचिन काळभोर,भाजप सरचिटणीस

