महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार 2024 ग.डी. माडगूळकर नाट्यगृह प्राधिकरण येथे पार पडला.
पिंपरी चिंचवड,दि.02: अप्रो ऑडिओ इव्हेंट इंटरटेनमेंट कंपनी आयोजित महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी ग.डी. माडगूळकर प्राधिकरण येथे मोठे उत्सव पार पडला.अभिनेता राहुल रांजणे आणि अभिनेत्री साक्षी गांधी यांच्या हस्ते प्रथमता मान्यवरांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजक : मा.अमोल गवळे व सौ.पूजा पांचाळ. मान्यवरांच्या वतीने आयोजकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नगरसेवक मा.श्री.उत्तम केंदळे यांची उपस्थिती लाभली. अभिनेता राहुल रांजणे अभिनेत्री साक्षी गांधी व नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अनेक भागातून आलेल्या उद्योजकांचे सन्मानचिन्ह व पदक देऊन त्यांचा मानसन्मान करण्यात आला.
व त्याच सत्कारमूर्तींपैकी एक असलेले प्रसिद्ध व्याख्याते मा. महादेव मांजमुळे यांचा देखील व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. उद्योजक कसा असावा व उद्योजकाची विचारशक्ती उद्योग कसा वाढवावा याविषयी व्याख्यान रंगल.


