पुणे शहरात अनेक ठिकाणी हातचलाखी करुन ए टी एम कार्ड अदला-बदली करुन पैसे काढून फसवणुक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलीस ठाणे कडून अटक
पिंपरी चिंचवड,दि.22: शिवाजीगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २५६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यात फिर्यादी हे बैंक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेले असता तेथील अनोळखी इसमाने फिर्यादी यांना ए टी एम मशिन मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ए टी एम कार्ड पिन नंबर माहिती करुन घेतल्यानंतर हात चालाखी करुन फिर्यादीकडील स्टेट बैंक ऑफ इंडिया या बँकेचे डेचिट कार्ड घेऊन त्यांना दुसरे स्टेट बैंकचे डेबिट कार्ड दिले व ए टी एम मध्ये पैसे नाही असे म्हणनू फिर्यादीस जाण्यास सांगितले. व सदर ए टी एम कार्ड व पिनच्या मदतीने आरोपीने फिर्यादी बैंक खात्यातून २९,०००/- रुपये कानून घेतले.
दिनांक १८/१०/२०२४ रोजी पोलीस उप निरीक्षक अजित बड़े व सोधत तपास पथकातील स्टाफसह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना वर नमुद गुन्ह्यातील संशयीत आरोपीच्या मिळत्या जुळत्या वर्णनाचा इसम पोलीस शिपाई प्रविण दडस यांना जे. एम. रोड येथे दिसून आल्याने त्याचे नाव पत्ता विचारले असता प्रमोद सिताराम बलमर वय ४७ वर्ष रा. सध्या जनवाडी, कोहिनूर फोटो स्टुडिओ जवळ, कुसाळकर पुतळा चौक, जनवाडी, पुणे व मुळगांव मु. पो. कान्हरवाडी, मधला माळा, ता. खटाव, जि. सातारा असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याचा अंगड़ाडती पंचनामा केला असता खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला.
१) महाराष्ट्र बैंकचे ए टी एम कार्ड त्याचा नंबर ५०८८५३००७३८७४४३०,
२) महाराष्ट्र बैंकचे ए टी एम कार्ड त्याचा नंचर ५०८८५३०६८८९१५१८०
३) महाराष्ट्र बैंकचे ए टी एम कार्ड त्याचा नंबर ६५२१५५००२१५३३०३०,
४) स्टेट बैंक ऑफ इंडिया बैंकचे कार्ड त्याचा नंबर ४५९१५६०४११०९१३१७
५) स्टेट बैंक ऑफ इंडिया बँकचे कार्ड त्याचा नंचर ८१७४०६०१९५६६७००८
६) स्टेट बैंक ऑफ इंडिया बैंकचे कार्ड त्याचा नंबर ६५२२९४०२७६२३३४९४
७) स्टेट बैंक ऑफ इंडिया बैंकचे कार्ड त्याचा नंबर ४५९१५६०१६०२४०९०९,
८) स्टेट बैंक ऑफ इंडिया बैंकचे कार्ड त्याचा नंबर ४१२१५१०००८८९४१८४,
९) कैनरा बैंकचे कार्ड त्याचा नंबर ६०७३९२०११९०२४६५९,
१०) बँक ऑफ इंडिया बँकचे कार्ड ६०७९४७०१६६२१०६७२,
11) किनो पेमेंट्स बँकचे कार्ड 6080022051362998
१२) १७,०५०/- रु. रोख रक्कम त्यामध्ये भारतीय चलनातील ५००/- रु. दराच्या एकूण ३४ नोटा, ५०/- रु. दराची एक नोट
सदर आरोपीस दि. १८/१०/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.
तपासा दरम्यान उघडकीस आलेले गुन्हे -
1) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हे रु. क्रमांक २५६/२०२४ भारतीय न्यायिक संहिता कलम ३१८ (४) २) शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हे रजि. क्रमांक २६३/२०२४ भारतीय न्यायिक संहिता कलम ३१८(४)
३) विश्रामचाग पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक २४२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४)
4) सिंहगड्रो पोलीस स्टेशन गुन्हे रु. क्रमांक ५८५/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३१८(४),३१९(२)
यातील अटक आरोपी यांच्यावर पुढील गुन्हे या आधी दाखल आहेत.
अ) वडुज पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक ४१४/२०१७ भादंवि. कलम ४२०
ब) दहीवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक ७२०/२०२३ भादंचि. कलम ४२०
यातील अटक आरोपी यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्याने पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ए टी एम सेंटर मध्ये ए टी एम कार्डची अदला-बदली करुन गुन्हे केल्याचे निष्पन्न होऊ शकतात, त्याधाचत अधिकचा तपास चालु आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त संदिप गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक अजित बडे, पोहवा. दिपक चव्हाण, पोहवा. सचिन जाधव, पोहवा. प्रमोद मोहिते, पोहवा. अतुल साठे, पोहवा. रुपेश वाघमारे पोहवा. राजकिरण पवार, पोना, महावीर वलटे, पोशि. प्रविण दडस, पोशि. सुदाम तायडे, पोशि. श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक अजित बड़े करत आहेत.

