मोबाईल चोरीच्या संशयावरून मारहाण करून निघुर्बुनपणे हत्या केलेल्या आरोपी यांना ३ तासात जेरबंद केले.

0 झुंजार झेप न्युज

शांतीनगर पोलीस ठाणे भिवंडी परिमंडळ-२, भिवंडी अंतर्गत कारवाई

मोबाईल चोरीच्या संशयावरून मारहाण करून निघुर्बुनपणे हत्या केलेल्या आरोपी यांना ३ तासात जेरबंद केले.

ठाणे,दि.26: दि. २३/१०/२०२४ रोजी ०८.३० वाजेचे सुमारास गोविंदनगर येथील राहुल हॉटेलचे पाठीमागे, नवीन सिमेंटचा तयार होत असलेल्या रोडवर, पाईपलाईनजवळ, भिवंडी येथे एक अनोळखी इसम कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून जिवे ठार मारले स्थितीत आढळुन आला. तेव्हा लागलीच सदरचे प्रेत हे पोस्ट मार्टम करीता आय.जी.एम हॉस्पीटल भिवंडी येथे पाठवुन पो.हवा./४०६४ शांताराम भाऊराव चौरे, वय ४० वर्षे, नेमणूक शांतीनगर पोलीस स्टेशन, भिवंडी यांचे फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाणे गु.रजि.न. १६३९/२०२४, बी.एन.एस. कलम १०३ (२) प्रमाणे गुन्हा दिनांक २३/१०/२०२४ रोजी १३.११ वाजता दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास शांतीनगर पोलीस ठाणेचे तपास पथक करीत असतांना सदर गुन्हयात मयत याचे मारेकऱ्याबाबत काहीएक माहिती नसतांना तसेच मयताची ओळख पटवुन अनोळखी मयत इसम याचे नातेवाईकांचा शोध घेतला असता मयत इसम याची ओळख पटवुन त्याचे नाव मोहमद रहमत शहा आलम वय २० वर्षे रा. कलकत्ता पश्चिम बंगाल असे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्हयाचा वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून बातमीदारामार्फत माहिती मिळवुन गुन्हयातील आरोपीत नामे १) आरमान अंसारी व त्याचे ५ ते ७ साथीदार यांनी गुन्हा केल्याचे माहिती मिळाली असता सदर माहितीच्या आधारे मोबाईल चोरीच्या संशयावरून लाकडी मारदांडयाने शरीरावर प्रहार करून जिवे ठार मारले असल्याची निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयात ७ आरोपीत यांना दि. २३/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल झालेपासुन ०३ तासाचे आतमध्ये अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी शांतीनगर पोलीस ठाणे यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. मोहन दहीकर, सहायक पोलीस आयुक्त, सचिन सांगळे, यांचे मागदर्शनाखाली शांतीनगर पोलीस गणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (प्रशा) विनोद पाटील, पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर, सपोनी/सुरेश चोपडे, सपोनि/सर्जेराव पाटील, पो.हवा/१८६५ रिजवान सैयद, पो.हवा/४५८८ काळुराम शिरोसे, पो.हवा/१२५५ संतोष पवार, पो.ना/६४६९ किरण जाधव, पो.ना/७१९७ दिनेश भुरकुट, पो.ना/१७७२ श्रीकांत पाटील, पो.शि/४७१७ दिपक सानप, पो.शि/८२४२ प्रशांत बर्वे, पो.शि/७०७७ मनोज मुके, पो.शि/८३१७ रोशन जाधव, पो. शि/५५५९ रविंद्र पाटील यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणणेची उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.