आकुर्डी रेल्वे स्टेशन पार्किंग जवळील हाईट बॅरिकेटचे काम थांबवण्या यावे.
पिंपरी चिंचवड,दि.28: सेक्टर २६ प्लॉट नंबर १ आकुर्डी रेल्वे स्टेशन समोर बी एस एन एल आफिस शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत स्थापत्य विभाग ह्यांच्या कडून हाईट बॅरिकेट बसविण्यात येत असून त्या संदर्भात जाहीर आक्षेप घेण्यात आला असून निवडणूक आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून उदय गार्डन सोसायटी ह्यांच्या मतदार ह्यांना आमिष दाखविले जात असून त्या ठिकाणी हाईट बॅरिकेट काम सुरू असून त्या मुळे पिंपरी विधानसभा निवडणुकीत येत्या काळात मतदार ह्यांना आमिष दाखविले जात असून त्या संदर्भात निवडणूक आयोग तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह व अ क्षेत्रिय कार्यालय ह्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा तसेच त्या ठिकाणी हाईट ब्रेकेट काम ताबडतोब थांबविण्यात यावे. अशी मागणी महेश कनकुरे प्रहार जनशक्ती पक्ष हवेली तालुका अध्यक्ष यांनी केली.

