आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व आता भाजप नेते अशोक चव्हाण यांचा वाढदिवस.
मुंबई,दि.26: जन्म. २८ ऑक्टोबर १९५८ जन्मापासून लाल दिवा आणि सुरक्षा बाळगणारा युवराज अशी अशोक चव्हाण यांची ओळख होती. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी केंद्र असो वा राज्य दोन्ही ठिकाणी अनेक महत्वाची पदे भूषवली. वडिल राजकारणात असल्याने साहजिकच अशोकरावांचे बहुतांश शिक्षण मुंबईतच झाले. अशोक चव्हाण यांचे यांचे शिक्षण अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयात झाले. अशोक चव्हाण यांच्यासोबत वर्गमित्र म्हणून महेश कोठारे, महेश मांजरेकर, डी पी सावंत आदी मंडळी होती. अशोक चव्हाण यांचे शिक्षण बी.एससी, एम.बी.ए.
विधानसभा, विधानपरिषदेवर आमदार, विविध खात्यांचे राज्यमंत्री, मंत्री, दोनदा मुख्यमंत्री आणि आता नांदेडचे आमदार आणि कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांना राजकीय बाळकडू घरातूनच मिळाले. वडील शंकरराव चव्हाण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुळचे पैठण (जि. औरंगाबाद) येथील असूनही नांदेड ही त्यांची कर्मभूमी असून युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकीय श्रीगणेशा करत त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. २६/११च्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरून जावेत, असे अनेकांना वाटत होते. मात्र ते जातील असे अनेकांना वाटत नव्हते. विलासरावांची महाराष्ट्राच्या राजकारणावरील पकड आणि दिल्लीतील सोनिया गांधींच्या गुडबूक्समधील नेत्यांबरोबर असलेला दोस्ताना पाहता त्यांच्या अश्वमेधाच्या घोडय़ाचा लगाम खेचणार कोण, असा प्रश्न होता. मात्र विलासराव देशमुख यांच्या उचलबांगडीचे संकेत मिळाले व ८ डिसेंबर २००८ रोजी अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
अशोक चव्हाण यांनी ठाकरे सरकार मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम बघीतले आहे.
अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपकडून चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. आता पक्षाने त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना आमदारकीची उमेदवारी दिली आहे.आता चव्हाण कुटुंबातील आता ही तिसरी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. या निवडणुकीत श्रीजया जिंकून आल्या तर त्यांचं राजकीय भवितव्यदेखील उज्ज्वल ठरण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघात श्रीजया यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.अशोक चव्हाण यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या भोकरच्या आमदार राहिल्या आहेत. नांदेड शहर आणि जिल्ह्यात त्या 'अमिता भाभी' याच नावानं ओळखल्या जातात. अशोक चव्हाण मुंबईमध्ये अंधेरीच्या भवन्स कॉलेजात शिकत होते. त्या वेळी ते एका पंजाबी मुलीच्या प्रेमात पडले. मुलीचं नाव होतं अमिता शर्मा. अमिता लग्न करून चव्हाण कुटुंबाच्या सून म्हणून आल्या तेव्हापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला.

