प्रबुद्ध भारताचे पुनर्निर्माण करणे हे बौद्ध समाजासमोरील आव्हान :- प्रबुद्ध साठे

0 झुंजार झेप न्युज

बौद्ध धम्मानेच बहुजनांचे ऐक्य करणे हे बौद्ध समाजासमोरील आव्हान : प्रबुद्ध साठे 

बौद्ध समाजाचे मार्गदर्शन व नेतृत्व न स्वीकारल्यामुळे बहुजन समाजाचे नुकसान : प्रबुद्ध साठे

 जातविरहीत समाज निर्मिती हेच बौद्धांसमोरील आव्हान.

प्रबुद्ध साठे कामोठे (पनवेल) : देव धर्म जातीच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडून व्यवस्था परिवर्तन करून प्रबुद्ध भारताचे पुनर्निर्माण करणे हे बौद्ध समाजासमोरील म्हणजेच आंबेडकरी समाजासमोरील आव्हान आहे, जातविरहीत समाज निर्मिती हेच आपले ध्येय व आव्हान आहे, बौद्ध समाज किंबहुना आंबेडकरी समाजाकडे बौद्धेत्तर दलित बहुजन मराठा आदिवासी इत्यादी बहुजन समाजाची बघण्याची जातीग्रस्त व नकारात्मक मानसिकतेमुळेच बहुजन समाजाचे नुकसान झाले असे वास्तव प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते बौद्धजन पंचायत समिती कामोठे.

नवी मुंबई शाखा क्रमांक ८०२ व यशोधरा महिला मंडळ आयोजित धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त व वर्षावास समारोप समारंभ निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धम्मक्रांती व बौद्धांसमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते, रक्ताचा एक थेंबही न सांडता 14 आक्टोबर 1956 ला मानवतेच्या युगा युगाची धम्मक्रांती केली , ज्यांना माणूस म्हणून धर्म व्यवस्थेने नाकारले होते त्यांच्या वरच बौद्ध धम्माने मानवतेची चळवळ उभी करण्याची जबाबदारी व मानवी कल्याणाचे ध्येय दिले, बुद्ध व धम्म घेऊनच आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करावी लागेल, व त्यातूनच बहुजन समाजाचे ऐक्य करून आंबेडकरवादी स्वतंत्र व स्वाभिमानी राजकारण प्रभावशाली करुया असेही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आर आर साळुंखे, , नागसेनजी गमरे, सुभाष भोसले (अमेरिका स्थित), एन एम वाघमारे, सुधाकर गायकवाड, भारत हातागळे, वंचित बहुजन आघाडी चे महेंद्र भाई आसुरडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी ॲड सानिया साळुंखे यांच्या सह इतर यशस्वी मुलींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती चे रमाकांत जाधव, चंद्रकांत कांबळे, रमेश घाडगे, विश्वनाथ जाधव, राजेश जाधव, महेंद्र पाटील, सुबोध जाधव, रमेश कांबळे तसेच यशोधरा महिला मंडळ च्या रसिका जाधव, वैशाली जाधव, रेणुका साळुंखे, कमल घाडगे, रोहिणी जाधव, पुजा कांबळे, वैशाली कांबळे, सुकेशनी जाधव आदींनी प्रयत्न केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.