दोन लाखाची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवल्याने पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

0 झुंजार झेप न्युज

दोन लाखाची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवल्याने पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

 

पिंपरी चिंचवड, दि.25: श्री. सचिन जाधवर, पोलीस हवालदार (वर्ग ३), नेमणुक कामती पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांचे विरोधात तक्रारदार यांचेकडून ५,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडाजोडी अंती २,००,०००/- रुपये मागणी करुन ती स्विकारण्यास संमती दिले वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गुन्हा नोंद क्रमांक कलम आरोपीचे नांव व कार्यालय मागणी केलेली लाचेची रक्कम तडजोडी अंती स्विकारण्यास तयारी दर्शविलेली लाचेची रक्कम सोलापूर युनिट, पुणे परिक्षेत्र.कामती पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७ अ प्रमाणे.श्री. सचिन जाधवर, पोलीस हवालदार (वर्ग ३), नेमणुक कामती पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण५,००,००० /- रुपये २,००,००० /- रुपये पडताळणी दिनांक ०४.१०.२०२३, रोजी

यातील तक्रारदार यांचे मुलाविरुध्द कामती पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असुन, सदर सदर गुन्हयामध्ये त्यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.हवा. जाधवर यांच्याकडे असुन, त्यांनी तक्रारदार यांना त्यांचे अटक केलेल्या मुलास गुन्हयाचे तपासात मदत करुन गुन्हयातुन लवकरात लवकर जामीन करण्यासाठी व गुन्हयाचा पुढील तपासामध्ये अजून आरोपीच्या संख्यामध्ये वाढ न करण्यासाठी न करण्यासाठी यातील आलोसे पोलीस हवालदार जाधवर यांनी स्वतःसाठी व वरिष्ठांना देण्यासाठी म्हणून पुन्हा तक्रारदार यांचेकडे ५ लाख रुपयांची मागणी करुन तडजोडी अंती २,००,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयार दर्शवील्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने, पोह सचिन जाधवर यांनी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया कामती पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्गदर्शन अधिकारी श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक लाप्रवि, पुणे. डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे.

सापळा पथक श्री. गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, पोह। सलीम मुल्ला पोशि / राजु पवार चापोशि/ शाम सुरवसे सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सोलापूर जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणा-या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ अगर दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८ वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.