राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष इम्रान शेख यांना अमोल कोल्हे यांनी हवाई सफर घडवून आणला.
पिंपरी चिंचवड,दि.29: पिंपरी चिंचवडचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचे मनापासून प्रेम करणारा सच्चा पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता, कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही पण पुरोगामी विचारधारेचे अनुकरण करत पक्षाशी कायम तत्परतेने व सातत्याने काम केल्यामुळे युवकाची धुरा त्यांच्या हातात देण्यात आली आणि आज त्यांच्या प्रामाणिक कामामुळे पक्षातले बरीच वरिष्ठ मंडळी इम्रानभाई यांचं कौतुक करत असतात, आज ही एक असंच योग आला, त्याच झाल असं की इम्रान भाई हडपसर विधानभेचे निरीक्षक असल्या कारणाने हडपसरच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही येणार आहात ना ! असा प्रश्न अमोल कोल्हेनी इम्रान भाई यांना विचारला त्यावर इम्रान शेख यांनी इकडे मतदारसंघात पण जुळवाजुळव करायची आहे खूप वेळ लागेल हडपसर जाऊन यायला माझ काही शाश्वती नाही मी थांबतो इथेच असे इम्रानभाई बोलले!
त्यावर स्मित हास्य करत खासदार साहेब म्हणाले इमरानभाई तू निरीक्षक आहेस चल तुझ्यासाठी आज हेलीकाप्टरच घेऊन जाऊ असे म्हणत हडपसर ला घेवून गेले. अगदी सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती खासदार झाल्यानंतर ही पाय जमिनीवरच आहेत हे तेंव्हा सिद्ध होते, कोल्हे साहेब आपल्या पक्षात काम करणाऱ्या युवकाला सोबत घेऊन जेंव्हा हेलिकॉप्टर ने घेऊन फिरतात यावरून त्यांच्या असामान्य नेतृत्वाची जाणीव होते..!

