भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड,दि.12: पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मकरंद निकम आणि मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास उप आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,मुख्य लिपिक देवेंद्र मोरे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

