क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे (क्यू सी एफआय) औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

0 झुंजार झेप न्युज

क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे (क्यू सी एफआय) औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग

पिंपरी चिंचवड,दि.29: क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टर ने यांच्या क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, भोसरी येथे गुणवत्ता स्पर्धा २०२४ आयोजित करून यावर्षीचा गुणवत्ता महिना साजरा केला हे सलग ११ वे वर्ष होते.या कार्यक्रमात ३५ संस्थां मधील ३०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात ६९ केस स्टडी, ३ स्किट, ३८ पोस्टर्स आणि ३८ स्लोगन या स्पर्धेत एकूण १४८ संघांचा समावेश होता. संघांनी त्यांची गुणवत्ता सुधार केस स्टडी, स्लोगन, पोस्टर आणि स्किट सादर केले.

या समारंभाचे उद्घाटन सरबजीत सिंग भोगल-टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि., कोम्पोजिट डिव्हिजन चे सीनियर जनरल मॅनेजर-ऑपरेशन्स हेड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या, क्वालिटी सर्कल च्या संचालिका डॉ.रजनी इंदुलकर, कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर, भूपेश मॉल आणि विजया रुमाले उपस्थित होत्या.

समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे राहुल वैद्य - मॅक्सियन व्हील्स इंडिया प्रा.लि.- व्यवस्थापकीय संचालक यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार क्वालिटी सर्कल चे कौन्सिल सदस्य अनंत क्षीरसागर यांनी केला.

हनुमंत टिकटे, मनीष फाले, प्रभु झुंजा, प्रशांत मुधलवाडकर, प्रवीण हाके, श्रीधर राव आणि विठ्ठल वाकचौरे यांनी केस स्टडीचे मूल्यमापन केले. घोषवाक्य आणि पोस्टरचे मूल्यमापन धनंजय वाघोलीकर आणि परविन तरफदार यांनी केले. पवनकुमार रौंदळ आणि प्रभू झुंजा यांनी गुणवत्तेवर प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली व या स्पर्धेत टाटा ऑटोकॉम्प - इंटिरियर प्लास्टिक डिव्हिजन यांनी स्पर्धा जिंकली.

प्रमुख पाहुणे राहुल वैद्य आणि क्वालिटी सर्कल पुणे चॅप्टर कौन्सिलचे सदस्य अनंत क्षीरसागर, भूपेश मॉल, धनंजय वाघोलीकर, परविन तरफदार आणि पवनकुमार रौंदळ यांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रजक आणि रौप्य स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन रहीम मिर्झा बेग , प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी केले.

 स्पर्धेतील सहभागी कंपन्या पुढीलप्रमाणे :

अभिजीत डाय अँड टूल्स प्रा.लि.-पालघर, अभिजीत प्लास्टिक इंडिया प्रा.लि.-खेड, अभिजीत टेक्नोप्लास्ट प्रा.लि.-नाशिक, अभिजीत इंडस्ट्रीज प्रा.लि.-दादरा आणि नगर हवेली, एडविक हाय-टेक प्रा.लि., आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि.-अशोक आयर्न- बेलगम, बेलराइज इंडस्ट्रीज लि, कमिन्स टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा.लि.-कोथरूड, कमिन्स टेक्नॉलॉजी इंडिया प्रा.लि.-पीसीपी-१, डॅक्स्टर पॉलिमर्स प्रा.लि., एस्क्वायर हेल्थ केअर अँड लॉजिस्टिक प्रा.लि., ग्रुपो अँटोलीन चाकण प्रा.लि., आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स-नाशिक, आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा.लि. चाकण , इंडियाना ग्रेटिंग्स प्रा.लि.-जेजुरी, जेसीबी इंडिया लि., मिंडा कॉर्पोरेशन लि., वायर हार्नेस (सावरदरी), मिंडा कॉर्पोरेशन लि., वायर हार्नेस-म्हाळुंगे, एमएसकेएच सीटिंग सिस्टम इंडिया प्रा.लि., एसकेएचएम इंडिया प्रा.लि., स्पार्क मिंडा प्रा.लि, मिंडा कॉर्पोरेशन लि., टॅको एअर इंटरनॅशनल थर्मल सिस्टम्स प्रा.लि., टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स लि., टाटा ऑटोकॉम्प-बस बार डिव्हीजन, टाटा ऑटोकॉम्प-कॉम्पोझिट डिव्हिजन, टाटा ऑटोकॉम्प जीवाय बॅटरीज् प्रा.लि., टाटा ऑटोकॉम्प-हेंड्रिक्सन  इंटिरियर प्लास्टिक डिव्हीजन, टाटा कमिन्स प्रा.लि.-फलटण, टाटा मोटर्स लि.-ईआरसी पिंपरी, टाटा मोटर्स लि.- कमर्शियल व्हेईकल, टेकोनेक्स इंडिया प्रा.लि., टीएम ऑटोमोटिव्ह सीटिंग सिस्टीम -चाकण, ट्यूब प्रोडक्ट ऑफ इंडिया-शिरवळ इत्यादी कंपन्यांनी सहभाग घेतला.

फोटोओळ : सरबजीत सिंग भोगल-टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम लि. यांचा सत्कार संचालिका डॉ. रजनी इंदुलकर यांनी स्मृतिचिन्ह देऊन केला, छायाचित्रात डावीकडून भूपेश मॉल व अनंत क्षीरसागर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.