राजधानीत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

0 झुंजार झेप न्युज

राजधानीत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

नवी दिल्ली,दि.19 : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली.कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात, निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त निवा जैन , सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.         

यावेळी निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव श्री. रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी शपथ दिली.   

महाराष्ट्र परिचय केंद्रात इंदिरा गांधी जयंती

महाराष्ट्र परिचय केंद्रात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली . महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी उपसंचालक (माहिती ) अमरज्योत कौर अरोरा यांनी उपस्थित कर्मचा-यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.