भारतीय संविधानाचा ७५ वा अमृत महोत्सवी दिन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा.
पिंपरी चिंचवड,दि.27: भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने पिंपरी येथील भिमसृष्टी स्मारकातील भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेला अभिवादन करण्यात आले.तसेच यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी दिनाच्या प्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि भारतासारख्या प्रचंड बलशाली राष्ट्राला प्रगतीपथाकडे घेऊन गेली ७५ वर्ष भारतीय संविधान यशस्वीपणे वाटचाल करत आहे आणि पुढील हजारो वर्ष हे संविधान वाटचाल करेल.
यावेळी संस्थेचे राज्य प्रवक्ता व मावळ तालुका महासचिव विक्रांत शेळके यांनी असे मत व्यक्त केले भारत देशात अनेक संस्कृती,विविध बोलीभाषा,विविध प्रांत,विविध जाती,विविध धर्म,विविध प्रथा परंपरा आहेत.आणि हीच आपल्या देशाची सुंदरता आहे आणि याला अबाधित ठेवण्याचे काम भारतीय संविधान करत आहे.त्यामुळे भारतीय संविधानाचे संवर्धन करणे हि देखील आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे,प्रदेश समन्वयक श्वेता साळवे,राज्य प्रवक्ता/मावळ तालुका महासचिव विक्रांत शेळके,प्रदेश संपर्क प्रमुख/मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मयूर जगताप,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अभिषेक चक्रनारायण,पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष भाग्यश्री आखाडे,श्रीयश कदम,निलेश आठवले उपस्थित होते.

