मुळशी तहसीलदार कार्यालयात गैरव्यवहाराचे सावट? बदली असूनही अधिकारी रुजू न झाल्याने प्रश्नचिन्ह
मुळशी | मुळशी तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी अजय गंगाधर सावंत यांच्याविरोधात पुन्हा एकदा गंभीर आरोप उभे राहिले आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ते मुळशी तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. मात्र, त्यांची दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी हवेली कार्यालयात बदली आदेशाने नियुक्ती करण्यात आली होती.
तरीही, सावंत यांनी राजकीय दबावाच्या आधारे बदलीकडे दुर्लक्ष करून मुळशी कार्यालयातच कार्यरत राहिल्याचा आरोप स्थानिक स्तरावर होत आहे.
या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, तक्रारकर्त्यांनी चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, सावंत यांच्या बदली आदेशानंतरही त्यांनी हवेली कार्यालयात रुजू न होता मुळशीतच कामकाज सुरू ठेवले, तसेच अनेक तक्रारी असूनही प्रशासन त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
तक्रारकर्ते सचिन काळभोर (भाजप कार्यकर्ता, पिंपरी चिंचवड) यांनी म्हटले की,
> “अजय सावंत यांच्या कार्यकाळात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. बदली आदेश असतानाही ते मुळशीत बसले आहेत, हे राजकीय पाठबळाचेच उदाहरण आहे. प्रशासनाने चौकशी करून तातडीने दंडात्मक कारवाई करावी.”
या प्रकरणामुळे प्रशासनावर राजकीय दबावाचा प्रभाव आहे का? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पारदर्शक चौकशी व क
ठोर कारवाई केली जावी.

