🛑 राजकीय वादाचा ठिणगी: शोकसभेतून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात
पिंपरी-चिंचवड : भोसरी विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे. शोकसभा कार्यक्रमादरम्यान सीमा ताई सावळे यांनी आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीतील पराभवाचे खापर आमदार महेश लांडगे यांच्यावर फोडल्याचा आरोप सीमा ताई सावळे यांच्यावर केला जात आहे. शोकसभा कार्यक्रमात दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर, भर सभेत सीमा ताई सावळे यांनी आमदार लांडगे यांच्यावर तसेच दिवंगत पालकमंत्री कै. अजित दादा पवार यांच्या संदर्भात टीका-टिप्पणी केल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी शांत भूमिका घेत सीमा ताई सावळे यांचे संपूर्ण भाषण ऐकून घेतले आणि त्यानंतर कार्यक्रमातून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या वतीने या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शोकसभा हा सर्वपक्षीय कार्यक्रम असून कै. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला वेगळे राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
वैयक्तिक टीका-टिप्पणी करण्यासाठी वेगळे व्यासपीठ असताना, शोकसभेसारख्या संवेदनशील कार्यक्रमात असे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करत पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने अधिकृत निषेध नोंदवण्यात आला आहे.
— सचिन काळभोर
भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता
पिंपरी-चिंचवड शहर

