निगडी–पिंपरी मेट्रो कामावर निर्बंधांची मागणी

0 झुंजार झेप न्युज

 निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याची तातडीची मागणी करण्यात आली आहे.


पिंपरी चिंचवड, दि.05: निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू असून, पोकलॅण्ड मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे खोदण्याचे काम चालू आहे. या कामामुळे परिसरात प्रचंड आवाज होत असून, स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळेत मोठा त्रास सहन करावा लागत आहे.विशेष बाब म्हणजे, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकरच सुरू होत आहेत. अशा संवेदनशील काळात रात्री सुरू असलेले हे गोंगाटयुक्त काम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे.

याबाबत पुणे मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी श्री. श्रावण हर्डीकर यांनी तात्काळ दखल घेऊन, निगडी बस स्टॉप परिसरात सुरू असलेले रस्ते खोदकाम रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलिस कंट्रोल रूम तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ही बाब अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने नागरिकांच्या त्रासाची तात्काळ दखल घ्यावी, अशी नम्र पण ठाम विनंती करण्यात येत आहे.

— सचिन काळभोर

भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता

पिंपरी-चिंचवड शहर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.