🔴 BREAKING NEWS | प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतरही पिंपरी-चिंचवडमध्ये गटबाजी उफाळली

0 झुंजार झेप न्युज

👉 प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाला केराची टोपली?

👉 महापौर–उपमहापौर नियुक्तीवरून भाजपमध्ये उघड गटबाजी

👉 कारवाईची जोरदार मागणी

पिंपरी-चिंचवड | दि. 05 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या महापौर व उपमहापौर पदांच्या नियुक्तीवरून मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी दिनांक २/२/२०२६ रोजी लेखी आदेशाद्वारे

➡️ रवींद्र बाबासाहेब लांडगे – महापौर

➡️ विजय उर्फ शितल शिंदे – उपमहापौर

अशी नियुक्ती जाहीर केली होती.

हे आदेश भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व संबंधित आमदारांना देण्यात आले होते. मात्र, याच वेळी विजय उर्फ शितल शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी इच्छुक नसल्याचे जाहीर करत माघार घेतली.


⚠️ सोशल मीडियावर पक्षाची उघड बदनामी

या घटनेनंतर सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय जनता पार्टीची उघड बदनामी सुरू झाली असून, पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


🎭 ऐनवेळी बदल – नाट्यमय घडामोडी

प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार उपमहापौर पदासाठी विजय उर्फ शितल शिंदे यांची नियुक्ती जाहीर झाली असताना, ऐनवेळी शर्मिला बाबर यांना संधी देण्यात आली.

या अचानक बदलामुळे शहरात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या असून,

➡️ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.


📢 तात्काळ कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी तात्काळ दखल घ्यावी व

➡️ पक्षात गटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी

➡️ निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी

➡️ हुकुमशाही पद्धतीने वागणाऱ्या कार्यकर्त्यांना तंबी द्यावी

अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.


या संदर्भात प्रदेशाध्यक्षांना ई-मेलद्वारेही तक्रार पाठवण्यात आली असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौर–उपमहापौर नियुक्ती प्रकरणात न्याय्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

— सचिन काळभोर

भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता

पिंपरी-चिंचवड शहर

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.