महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन....

0 झुंजार झेप न्युज

 महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन....


पिंपरीदि. १७ फेब्रुवारी २०२६ : "जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी" अशी क्रांतिकारी घोषणा करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांना साथ देणारे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे देशासाठी दिलेले योगदान देशभक्तीची सतत प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास तसेच महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबरनगरसदस्या अनुराधा गोरखे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडेनगरसचिव मुकेश कोळपउपायुक्त अण्णा बोदडेविशेष अधिकारी किरण गायकवाडजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडेनितीन घोलप,संजय धुतडमलराजू आवळेभाऊ कसबेबाळासाहेब रसाळशिवाजी खडसेरवींद्र वाघमारेनाना कांबळेनामदेव रिटे,मारुती सोनटक्केबाळासाहेब खंदारेअनिकेत साळवेजितेंद्र मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले कीस्वतः युध्दनितीनिपुण असलेल्या आणि देशभक्तीने प्रेरित झालेल्या क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी हजारो क्रांतिकारकांची फौज तयार केली आणि इंग्रजाविरूध्द मोठा लढा दिला तर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी परकीय सत्तेविरुद्ध ठाम भूमिका घेत स्वातंत्र्याच्या विचारांना नवे बळ दिले आणि देशनिष्ठेचा आदर्श निर्माण केला,या दोन्ही महापुरुषांचे योगदान देशातील स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे असून त्यांच्या देशभक्तीचा,महान कार्य कर्तृत्वाचा वारसा जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेलअसे महापौर लांडगे यांनी सांगितले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.