महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत व्यापक अतिक्रमण कारवाई....

0 झुंजार झेप न्युज

 महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत व्यापक अतिक्रमण कारवाई....


पिंपरी,दि.१० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या कालावधीपासून आतापर्यंत  आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत एकूण १४३ अनाधिकृत बांधकामे१ हजार २६० फ्लेक्स१३ हजार ९७ केऑक्स११५ हातगाड्या६० टपर्‍या तसेच २ हजार ९९५ टेबलवजन काटेखुर्च्याबाकडेझेंडे व इतर साहित्य हटविण्यात व जप्त करण्यात आले आहेअशी माहिती अतिक्रमण विभागाचे (मुख्यालय) सहाय्यक आयुक्त  तथा क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी दिली.आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये अतिक्रमण निरीक्षकबीट निरीक्षकमहाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे जवान तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकांचा समावेश होता.

महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईची आकडेवारी -

१) अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १३ अनाधिकृत बांधकामे हटविण्यात आली. यासोबतच ४८ फ्लेक्स३ हजार १२१ केऑक्स३७ हातगाड्या३५ टपर्‍या तसेच ४५२ टेबलवजन काटेखुर्च्याबाकडेझेंडे व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

२) ब क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत २९ अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून ५५७ फ्लेक्स३ हजार ५ केऑक्स३ हातगाड्या तसेच ४८१ विविध साहित्य जप्त करण्यात आले.

३) क क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत २ अनाधिकृत बांधकामे२७० फ्लेक्स१ हजार ९३९ केऑक्स२ हातगाड्या१३ टपर्‍या व ४८९ इतर साहित्यावर कारवाई करण्यात आली.

४) ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अनाधिकृत बांधकाम आढळून आले नसले तरी ९६ फ्लेक्स१ हजार २१५ केऑक्स१५ हातगाड्या१ टपरी व १९ इतर साहित्य हटविण्यात आले.

५) इ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १ अनाधिकृत बांधकाम७१ फ्लेक्स१ हजार २४१ केऑक्स२० हातगाड्या१ टपरी तसेच १ हजार ३१९ इतर साहित्यावर कारवाई करण्यात आली.

६) फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ३५ अनाधिकृत बांधकामे६५ फ्लेक्स९६७ केऑक्स१३ हातगाड्या३ टपर्‍या व ५७ इतर साहित्य हटविण्यात आले.

७) ग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ११ अनाधिकृत बांधकामे८५ फ्लेक्स५१५ केऑक्स२३ हातगाड्या१ टपरी व ५२ इतर साहित्यावर कारवाई करण्यात आली.

८) ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ५२ अनाधिकृत बांधकामे६८ फ्लेक्स१ हजार ९४ केऑक्स२ हातगाड्या६ टपर्‍या व १२६ इतर साहित्य जप्त करण्यात आले.

तरी शहरातील सार्वजनिक रस्तेपदपथ व मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे अतिक्रमण करू नये. भविष्यातही नियमभंग करणाऱ्यांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहेअसे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.