पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता…

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता…

पिंपरी चिंचवड,दि.12 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्तीशहरातील दिव्यांची दुरुस्ती व देखभालदफनभूमी सुरक्षा  नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या प्रकल्पांसाठी टाकणेतसेच महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी खर्च यासह मनपा हद्दितील मालमत्ता कराची बिले वाटणाऱ्या महिलांनी नवीन मालमत्ता शोधल्यास त्यांना मनपाच्या कर संकलन विभागाच्या मंजूर दराने मानधन देण्याबाबतच्या उपसूचनेला मंजुरी देण्यात आली. या सोबतच “मुख्यमंञी - माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज बचत गटांतील माहिलामार्फत भरून घेतलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळपुणे महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थेस माहे जूलै २०२४ ते सप्टेंबर -२०२४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता अदायगी करणे बाबतच्या उपसुचनेस आज महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकरनगरसचिव मुकेश कोळपअतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटेतृप्ती सांडभोरविक्रांत बगाडे यांच्यासह स्थायी समिती सदस्य व महापालिका संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आजच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्येपाणी पुरवठा विभागाकडील शहरातील पाण्याची तसेच नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणेघरकुल पासून जाधववाडी पंप हाऊस पर्यंत आवश्यकतेनुसार पाईप लाईन टाकणेकुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौक देहू आळंदी रोड पर्यंत आवश्यकतेनुसार पाईप लाईन टाकणेकाळेवाडी परिसरातील दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती च्या कामांना मंजुरीप्रभाग क्र. १७ मध्ये दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती करणेप्रभाग क्र. १६  मध्ये दिव्यांच्या देखभाल व दुरस्ती करणेब क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती व अनुषांघिक कामे करणेमोशी येथे दफन भूमी विकसित करून अंतर्गत विद्युत विषयक कामे करणेयमुनानगर रुग्णालयात जनित्र संच बसविणेनिगडी अमरधाम  स्मशानभूमी येथे जनित्र संच उभारणेप्रभाग क्र. १ व १२ मधील विविध चौक व कमानीचे सुशोभीकरण व अनुषांघिक कामे करणेभक्ती शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणेमनपा शाळाकार्यालयेदवाखाने याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई व स्वच्छता कामांना मंजुरी देणेजीवन नगर ताथवडे येथील पंप हाऊस चा वीज भार उपलब्ध होण्यासाठी म.रा.वि.वि कंपनीस रक्कम अदा करणेभामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उब्रे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मी.मी.व्यासाची रायझिंग मेन टाकणे व बी.पी.टी. ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मी.मी. व्यासाची गुरुत्व जलवाहिनी टाकणेकामी अडथळा  ठरणाऱ्या उच्चदाब खांब व तारा स्थलांतरित करणेसेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रा जवळील म.रा.वि.वि कं. ची २२ के व्ही उपस्कर वाहिनी हटविणेप्रभाग क्र११ व १३ मधील जुने गंजलेले व धोकादायक पोल बदलणे व अनुषांगिक कामे करणेलिंकरोड चिंचवड ख्रिश्चन स्मशानभूमीदापोडीनिगडीदिघी मुस्लिम दफनभूमीदिघी लिंगायत दफन भूमी येथील काळजीवाहक संस्थाना मुदतवाढ देणेशहरातील मालमत्ता धारकांना बिले अदा करण्यासाठी नेमलेल्या महिला बचत गटांना १०% रक्कम अदा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  तसेच नगरसचिव विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना रजा मंजूरी खर्चास देखील  आजच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अनुदान देण्याच्या उपसूचनेस बैठकीत मान्यता देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.