निगडी सेक्टर २२ मध्ये गोमांस विक्रीचा आरोप; कत्तलखाना बंद करण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

0 झुंजार झेप न्युज

 निगडी सेक्टर २२ मध्ये गोमांस विक्रीचा आरोप; कत्तलखाना बंद करण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

पिंपरी चिंचवड : निगडी येथील सेक्टर २२ परिसरात संजय हॉटेल शेजारी असलेल्या जागेत गोमांस खरेदी-विक्री आणि कथित कत्तलखान्याचा व्यवहार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असल्याचे सांगत स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गायकवाड यांच्या घराशेजारी असलेल्या या ठिकाणी गोमांस खरेदी-विक्री होत असल्याची माहिती स्थानिकांना मिळत होती. याबाबत पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त, निगडी पोलिस ठाणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, काल रात्री काही गोरक्षकांनी संशयित वाहनाचा पाठलाग करून गाई आणि गोमांस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी फौजदारी गुन्हा नोंदविल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या सुरू असलेल्या रोजा काळात आर्थिक फायद्यासाठी हा व्यवहार वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणचा कथित कत्तलखाना तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त, महानगरपालिका आयुक्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे तक्रार पाठवली असून या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

“गोहत्या प्रकरणी कडक कायद्यांतर्गत कारवाई करावी आणि संबंधित ठिकाणी सुरू असलेला व्यवहार कायमस्वरूपी बंद करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सध्या या प्रकरणाकडे पोलिस आणि प्रशासनाचे लक्ष लागले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.