भोसरीतील जुन्या भाजप कार्यकर्त्यांना न्याय द्या; खासदार विनोद तावडे यांच्याकडे एकनाथ पवार यांची मागणी

0 झुंजार झेप न्युज

शहर कार्यकारिणी, स्वीकृत नगरसेवक व महामंडळांमध्ये संधी देण्याची मागणी; पालखी सोहळ्यादरम्यान सदिच्छा भेटीत मांडल्या कार्यकर्त्यांच्या भावना

भोसरीतील भाजपच्या अंतर्गत नाराजीची चर्चा 

• जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप 

• विनोद तावडे यांना निवेदन 

• सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना शहर कार्यकारिणी तसेच विविध पदांवर संधी दिली जात नसल्याचा आरोप करत ज्येष्ठ नेते एकनाथ पवार आणि संतोष तापकीर यांनी भाजपचे खासदार विनोद तावडे यांची सदिच्छा भेट घेत कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

पालखी सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत भोसरी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेतील नियुक्त्या, स्वीकृत नगरसेवक पदे तसेच विविध महामंडळांवरील संधी याबाबत चर्चा झाली. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

एकनाथ पवार यांनी सांगितले की, संतोष तापकीर, अजय पाताडे आणि पोपट हजारे हे भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांना पक्ष संघटनेत किंवा महत्त्वाच्या पदांवर संधी मिळालेली नाही. त्यामुळे पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.

भेटीदरम्यान भोसरी विधानसभा मतदारसंघ हा कोणत्याही व्यक्तीचा किंवा खाजगी संस्थेचा नसून भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत सर्वजण कमळ या एकाच चिन्हाखाली काम करतात. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका एकनाथ पवार यांनी मांडली.

यावेळी एकनाथ पवार यांनी सन २०१४ मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्या पार्श्वभूमीवर आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना पक्षात योग्य संधी दिली जात नसल्याचा आरोपही केला.

कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन खासदार विनोद तावडे यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, या संदर्भात आमदार महेश लांडगे यांची भूमिका समोर आलेली नसून, त्यांच्या बाजूने प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.