उमरोळी परिसरात वन विभागाची तत्पर कारवाई; तपासाला गती, नागरिकाना सतर्क राहण्याचे आवाहन

0 झुंजार झेप न्युज

उमरोळी परिसरात वन विभागाची तत्पर कारवाई; तपासाला गती, नागरिकाना सतर्क राहण्याचे आवाहन

पालघर,दि.२९ : पालघर तालुक्यातील उमरोळी परिसरात दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री कैलास लक्ष्मण उमटोल (रा. टोकरेपाडा, पडघा) हे जखमी अवस्थेत आढळून आले. वन विभाग व पोलीस विभागाने तत्परता दाखवत घटनास्थळी तातडीने भेट देऊन पंचनामा केला असून, प्राथमिक उपचार करता जखमी यांना शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आलेले आहे.पुढील तपास प्रगतीपथावर आहे.
घटनास्थळी दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत, सरपंच व ग्रामस्थांच्या सहभागाने पाहणी करण्यात आली. परिसरातील विद्युत खांब व कापलेल्या तारा घटनास्थळी आढळल्या. पंचनाम्यातील GPS नोंदींमुळे घटनास्थळाचा अचूक नकाशा तयार होण्यास मदत होत असून पुढील तपासाला ठोस आधार मिळाला आहे.
विद्युत वाहिनीवरील काही खांब व तारा कापलेल्या अवस्थेत आढळल्या, तर काही तारा अलीकडेच कापल्या गेल्याचे निदर्शनास आले. कटर व इतर साहित्य सापडल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. पाहणी करणाऱ्या पथकाने सर्व पुरावे जप्त करून सुरक्षित ठेवले आहेत.
जखमी कैलास उमटोल यांच्या पायाला जखम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. वैद्यकीय अधिकारी होम टोल यांच्यावर रुग्णालयात उपचार करत आहेत.वन व पोलीस विभागाच्या पथकाने त्यांना प्राथमिक मदत देऊन पुढील वैद्यकीय उपचाराची व्यवस्था केली. त्यांनी प्राथमिक माहितीत बिबट्याच्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे.तरी घटनेनंतरच्या नंतर वन विभागाच्या तपासात बिबट्याचा pugmark पायाचे ठसे आढळलेला नाही. जबाबातून तपासाची दिशा अधिक स्पष्ट होईल.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवी जीवितहानी किंवा इजा झाल्यास नुकसान भरपाईची प्रक्रिया शासनाच्या राजपत्रात २०२४ नमूद आहे. घटनेची लेखी सूचना जवळच्या वनरक्षकाला द्यावी लागते. अर्ज घटनेपासून ४८ तासांच्या आत नमुना-एकमध्ये वनक्षेत्रपालाकडे सादर करावा लागतो. परिपूर्ण प्रकरण सहायक वनसंरक्षकांकडे मंजुरीसाठी पाठवले जाते.वन्य प्राण्याने हल्ला केल्यास बाधित व्यक्तीला नुकसान भरपाई मिळेल ती केवळ वन्य प्राण्याने हल्ला केल्याचे सिद्ध झाल्यासच. संबंधित व्यक्ती वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या तरतुदींचे उल्लंघन करत असताना घटना घडली असेल, तर भरपाई मिळत नाही. वेळेची मर्यादा आणि लेखी प्रक्रियेमुळे पीडित कुटुंबांना वेळेत मदत मिळण्याची शक्यता वाढते.घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने परिसरात सखोल गस्त घातली. वन्यप्राण्याच्या हल्ल्याबाबत अनावश्यक भीती न बाळगता नागरिकांनी शासकीय यंत्रणेकडून अधिकृत माहितीची वाट पहावी, असे आवाहन करण्यात येत आहे. वन्यजीव व मानव यांच्यातील सहअस्तित्व टिकवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
उमरोळी येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या कैलास उमटोल यांच्या प्रकरणात बिबट्याचा ठोस पुरावा सध्या आढळलेला नाही. वनविभागाची कारवाई सुरू आहे. वन्यप्राणी हल्ला सिद्ध झाल्यासच नुकसान भरपाई स्पष्ट मुदती व लेखी प्रक्रियेनुसार दिली जाते. परिसरातील बिबट वन्यप्राण्यांच्या हालचालींची माहिती तातडीने वन विभाग किंवा पोलीस यंत्रणेला द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.