📍 न्यायालयीन कामकाजात अडथळा आणल्याने पोलिसांची कारवाई!

0 झुंजार झेप न्युज

मा. न्यायालयाचे कक्षात दंगा, शांततेस बाधा निर्माण करुन पोलीसांना तसेच न्यायालयातील स्टाफला धक्कबुक्की करुन न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपींना मा. न्यायालयाने १०००/- दंड केला व सर्वांवर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.

पुणे,दि.01 : आज दि.३०/१०/२०२६ रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी कोर्ट क्र.१ येथे समर्थ पोलीस ठाणेकडील आर.सी.सी. प्रकरण क्र.६२६४/२०२५ महाराष्ट्र शासन वि. प्रशांत नामदेव पवार व इतर कलम ६९, ३१८ (४), ३५६(२), ३(५) हे प्रकराण बार्डावर होते. साधारण ११/५० वा सुमारास मा. न्यायालयाचे कामकाज चालु असताना म्हणजेच पी.डब्ल्यु.डी. व्हि. १२७/२०२३ ह्या केसमध्ये मा. न्यायालय आदेश पारीत करत असताना कोर्टामध्ये येवून समर्थ पोलीस ठाणेकडील आरसीसी प्रकरण क्र. ६२६४/२०२५ मधील फिर्यादी, आरोपी व त्यांचे नातेवाई नामे १) नामदेव उमाजी पवार वय-५९ वर्षे २) प्रशांत नामदेव पवार वय ३२ वर्षे ३) शांता नामदेव पवार वय-५२ वर्षे ४) सोपान विठ्ठल चव्हाण वय ३३ वर्षे सर्व राहणार १९७ सर्वे नंबर १४/१२०, मोरे वस्ती चिखली पुणे ५) अमित विलास पवार वय ३२ वर्षे ६) आशा गोरखनाथ चव्हाण वय ३१ वर्षे रा. महात्मा फुले नगर, माळी मळा, लोणीकाळभेर व ७) सविता लहु चव्हाण वय ३८ वर्षे धंदा-शेत मजूरी ८) लहू नारायण चव्हाण वय ४४ वर्षे धंदा शेती ९) प्रांजल लहू चव्हाण वय २३ वर्षे सर्व राहणार रामनगर तांडा ता. माजलगाव जि. बीड. यांनी एकमेकांना धक्काबुक्की, शिवीगाळ करुन पोलीसांना व न्यायालयीन स्टाफला धक्काबुक्की केली.

सदर झाले प्रकाराबाबत मा. न्यायालयाने आरोपीतांना दोषी धरून १०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधा कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच नमुद सर्व इसमा विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम १३२, २६७, १८९(२), १९०, १९१(१) (२), १९४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.