निगडी सेक्टर क्र. २२ मधील रिक्त सदनिकांमध्ये अनधिकृत प्रवेश करू नये; अन्यथा कारवाई
पिंपरी चिंचवड,दि.01: केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान (JnNURM) तसेच शहरी गरीबांसाठी मूलभूत सेवा (BSUP) योजनेंतर्गत निगडी येथील सेक्टर क्र. २२ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या व सध्या रिक्त असलेल्या ६४० सदनिकांमध्ये कोणीही अनधिकृत प्रवेश अथवा अतिक्रमण करू नये. अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या JnNURM – BSUP योजनेंतर्गत निगडी येथील सेक्टर क्र. २२ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पांतर्गत एकूण ११ हजार ७६० सदनिकांच्या बांधकामाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ३ हजार ४४० सदनिकांचे काम पूर्ण झाले असून, २ हजार ८८० सदनिका पात्र लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या प्रकल्पाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशामुळे प्रकल्पाती

