ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, आमची प्राथमिकता! ‘आधारवड’ ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठांना सुरक्षिततेचा आधार
ठाणे,दि.02 : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्य यांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेतर्फे विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विश्वनाथ बिवलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, कल्याण आणि सुरक्षिततेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालयाने विकसित केलेल्या ‘आधारवड’ ॲपचे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेले महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. या ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेसाठी कशा प्रकारे मदत मिळू शकते, याबाबत माहिती देण्यात आली.
तसेच वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मारुती कदम यांनीही उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मदत मिळावी आणि त्यांचे जीवन अधिक सुरक्षित व सन्मानपूर्ण व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ज्येष्ठांचा सन्मान, सुरक्षितता आणि आधार हीच सामाजिक बांधिलकी!

