आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार आहे तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील आमच्या बरोबर येणार असल्याचा दावा, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. भाजपा समर्थक असेलेले रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार आहेत. शिवाय विधानसभेवर ते तिसऱ्यांदा निवडून गेलेले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करतील, असं भाकीत केलं होतं.
Yuva Swabhiman Party MLA, Ravi Rana who pledged support to BJP earlier, after meeting with Maharashtra Deputy CM: I congratulated him, it took time but state now has good CM & Deputy CM. MLAs will be more than 175, it will increase even more due to what is happening in Shiv Sena.
1,089 people are talking about this
सध्या राज्यात सुरू असलेल्या वेगवाग घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना आमदार राणा यांनी सांगितले की, मी उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले आहे.
याचबरोबर भाजपा सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १७५ पेक्षाही जास्त होणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आम्ही यादी तयार केलेली असून त्यातून हा आकडा आला आहे. शिवसेनेत सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे हे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


