बंदोबस्तावर असताना अचानक मध्यरात्री घरी येऊन एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने बेडरूममध्ये पंख्याला गळफास लाकून आत्महत्या केली. पती हॉलमध्ये झोपले असल्याने रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
सरस्कती किसन वाघमारे (29, रा. इंद्रप्रस्थ हौसिंग सोसायटी, विकासनगर, देहू रोड) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती वाघमारे ह्या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होत्या.
मात्र, कार्तिकी एकादशीनिमित्त देहूगाव येथे बंदोबस्तासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून त्या बंदोबस्तावर होत्या. शनिवारी त्यांना नाईट डय़ूटी देण्यात आल्यामुळे त्या रात्री नऊच्या सुमारास देहूगाव येथे बंदोबस्तासाठी गेल्या. जाताना सकाळी साडेनऊपर्यंत घरी येणार असल्याचे त्या सांगून गेल्या होत्या. मात्र, रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्या अचानक घरी आल्या. त्यांचे पती विकास पांडुरंग झोडगे ( 35) यांनी लवकर येण्याबाबत किचारले असता, सरस्वती काहीही न बोलता बेडरूममध्ये गेल्या होत्या.

