नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, बुलेट ट्रेन प्रकल्पावर होणाऱ्या खर्चाची भरपाई महाराष्ट्रातील जनतेच्या खिशातून होवू दिली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसाच्या कार्यकाळात चाळीस हजार कोटी रुपये केंद्राकडे वळते केले असल्याचा गौप्यस्फोट भाजपच्या खासदाराने केला आहे. याबाबत विचारले असता राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
राऊत म्हणाले, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशात, बुलेट ट्रेनवर पैसा खर्च करण्याऐवजी तो शेतकऱ्यांवर खर्च केला जाईल. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर 40 हजार कोटी रुपये वळते केले असेल तर या मुद्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुख्य सचिव जनतेला माहिती देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

