भाजपची पहिली उमेदवारी यादी रविवारी प्रसिद्ध होणार - आमदार शंकर जगताप निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही; शंकर जगताप

0 झुंजार झेप न्युज

भाजपची पहिली उमेदवारी यादी रविवारी प्रसिद्ध होणार - आमदार शंकर जगताप निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही; शंकर जगताप

पिंपरी चिंचवड,दि.27 : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी विधानसभानिहाय उमेदवारांचा आढावा घेतला असून, उमेदवारांची पहिली यादी रविवारी  (दि. २८) प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी (दि. २६ ) हि माहिती दिली.

आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले, दोन दिवसात उमेदवार यादी  जाहीर करण्यात येणार आहे. पालिका  निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी आम्ही प्रदेश कार्यालयाकडे पाठविली आहे .  मुंबईत या संदर्भात बैठक झाली.  बैठकीला सर्व कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. उमेदवारांचा विधानसभा निहाय आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी निश्चित आहे त्या नावांना अंतिम मान्यता देण्यात आली असली तरीही अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचाच असणार आहे. त्यानुसार प्रदेश आणि कोअर कमिटी याबाबत निर्णय घेईल.

भारतीय जनता पक्ष हा विकासाचे व्हिजन पुढे ठेवून काम करणारा पक्ष आहे.  त्यामुळे विरोधक कितीही एकत्र आले तरीही त्याचा आमच्या पक्षावर  परिणाम होणार नाही . आमच्या उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना वेळोवेळी न्याय देण्यात येतो हा इतिहास आहे. कुठल्याही परिस्थितीत निष्ठावंत कार्यकर्त्यावर पक्षाकडून अन्याय होत नाही त्यामुळे आमच्या उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरही कोणत्याही प्रभागात नाराजी दिसून येणार नाही.  भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष आहे.  त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये येऊन विकासाचे व्हिजन घेऊन कोणी काम करण्यासाठी इच्छुक असेल तर पक्षाकडून त्याचे स्वागतच केले जाते असे देखील आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांना माझा नेहमीच पाठिंबा असतो. कार्यकर्त्यांच्या बळावरच कोणतीही लढाई जिंकली जाते.  उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतरही निष्ठावंतांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला असे दिसणार नाही. सर्वेक्षणानुसार विजयाची क्षमता असणारे उमेदवार निवडण्यात येणार आहेत ही भाजपची रणनीती आहे. त्यानुसारच पक्षश्रेष्ठींकडून उमेदवार यादी अंतिम करण्यात येत आहे.

थम्पिंग मेजॉरिटीने भाजप विजयी होईल

प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग आपण या सूत्रावर भारतीय जनता पक्षाचे काम आधारित आहे. हा विचार घेऊनच या पक्षामधील प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. पक्षाचा आदेश हेच अंतिम ध्येय असते. त्यामुळे नाराजी किंवा विरोध असे कोणीही कार्यकर्ता करत नाही. तिकीट मिळेपर्यंत नाराजी असते.  मात्र एकदा पक्षाचा आदेश आला की आपण कामाला लागायचे असते.भाजपमध्ये सध्या इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त प्रमाणात आहे.  त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये ''थम्पिंग मेजॉरिटी''ने भाजप विजयी होणार आहे असा विश्वास आहे.

उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची काळजी पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष मोठा होत असतो.  त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्ष न्याय देईलच असा मला विश्वास आहे. उमेदवारांची पहिली यादी रविवारी  (दि. २८) प्रसिद्ध करण्यात येईल.  पक्षाचा आदेश आल्यानंतर सर्वजण एक दिलाने, एक विचाराने काम करणार असून, पिंपरी चिंचवड महापालिकेत कमळ फुलविल्याशिवाय राहणार नाहीत.

- शंकर जगताप
निवडणूक प्रचार प्रमुख
आमदार, पिंपरी चिंचवड शहर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.