भुसावळ-नागपूर पॅसेंजर 25 दिवस रद्द

0 झुंजार झेप न्युज

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात प्लॅटफार्म क्रमांक एक व दोनच्या उभारणीसाठी अप-डाऊन नागपूर पॅसेंजर 9 जानेवारी ते 2 फेबु्रवारीदरम्यान रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. अप 51286 नागपुर-भुसावळ व डाऊन 51285 भुसावळ-नागपूर पॅसेंजर 9 जानेवारी ते 2 फेबु्रवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
वर्धा पॅसेंजरही काही दिवस रद्दअप 51262 वर्धा-अमरावती पॅसेंजर 11 व 12, 18 व 19, 20, 25, 26 जानेवारी व 1 व 2 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात येणार आहे तर डाऊन 51261 अमरावती-वर्धा पॅसेंजर 11, 12, 18 व 19, 25, 26, 2 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान गाडी क्रमांक 12290 अप नागपुर-मुंबई दुरांतो 9 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नागपूर ऐवजी अजनी स्थानकावरून सुटेल तर डाऊन 12289 मुंबई-नागपुर दुरांतो 9 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान अजनी रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.