दाऊदचा साथीदार एजाज लकडावाला याला अटक; २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

0 झुंजार झेप न्युज

मुंबई : मुंबई पोलिसांना बुधवारी मोठे यश मिळाले आहे. बुधवारी पाटण्यामध्ये एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी विमानतळावरून अटक केली आहे. लकडावालाविरोधात खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी एजाज लकडावाला याला अटक करण्यात आल्याची माहिती गुरुवारी दिली.
Gangster Ejaz Lakdawala arrested from Patna by Mumbai Police's anti extortion cell, remanded to police custody till January 21 by Court
View image on Twitter
105 people are talking about this

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाज लकडावाला परदेशात राहून भारतात खंडणी वसुलीचे रॅकेट चालवत होता. देशातील काही मोठ्या लोकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे काम त्याच्या टोळीकडून केले जात होते. तो पाटण्यामध्ये येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यावर कारवाई करीत त्याला विमानतळावरूनच अटक करण्यात आली.
गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण 25 गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांचा जवळचा म्हणून एजाज लकडावाला ओळखला जातो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.