अहमदनगरमध्ये रोहित पवारांचा राम शिंदेंना पुन्हा दणका

0 झुंजार झेप न्युज

अहमदनगर | कर्जत पंचायत समितीमधील भाजपची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार राम शिंदे यांना राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा धक्का दिला. कर्जत पंचायत समितीमध्ये आठ सदस्य असलेल्या सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या आश्विनी कानगुडे यांनी विजय मिळवला आहे.
कर्जत पंचायत समितीमध्ये सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या साधना कदम भाजपमध्ये जाऊन सभापती झाल्या होत्या. या निवडणुकीत कदम उभ्या राहिल्या नाहीत. त्यामुळे भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक, असे तीनच सदस्य भाजपकडे राहिले. संख्याबळ नसल्याने भाजपने सभापतीचा अर्ज मागे घेतला.
त्यामुळे आश्विनी कानगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. आरोप प्रत्यारोप आणि टीकांनी कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती. रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघातून राम शिंदेंना 43 हजार 947 मतांनी पराभूत केलं होतं.
दरम्यान. निवडणुकीतील सर्व मतभेद बाजुला ठेवून रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. एवढंच नाही तर शिंदे यांच्या मातोश्रींचा आशीर्वाददेखील पवारांनी घेतला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.