बंडातात्या कराडकर यांनाही संपवायचे होते

0 झुंजार झेप न्युज

युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि ह.भ.प. जयवंत पिसाळ या दोघांनी आपल्याला मठाधिपतिपदावर खाली खेचले, मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी देत नव्हते. या अपमानाचा बदला म्हणून मी बंडातात्या अन् जयवंतला संपविण्याचा निर्णय घेतला होता; पण तात्यांनी एक दिवस आधीच पंढरपूर सोडल्याने ते माझ्या तावडीतून सुटले, अशी खळबळजनक कबुली बाजीराव जगताप-कराडकर याने पोलिस तपासात दिला. दरम्यान, या खूनप्रकरणी आरोपी बाजीराव कराडकर-जगताप यास न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कराडकर मठाचे त्यावेळचे मठाधिपती वैकुंठवासी भगवान महाराज कराडकर 1958 ते 2009 पर्यत मठाधिपतीपदी कार्यरत होते.
त्यांच्या वैकुंठगमनानंतर ह.भ.प. बाजीराव भागवत जगताप ऊर्फ बाजीराव जगताप-कराडकर (वय 34, रा. कोडोली, कराड) यांची मठाधिपती एकमुखाने नियुक्ती करण्यात आली.
त्यानंतर बाजीराव चुकीच्या पद्धतीने वागू लागल्याने ज्येष्ठ मंडळी बाजीराववर नाराज होती. त्यातून त्याला मठाधिपतिपदावरून बाजूला केले आणिहभप जयवंत हिंदुराव पिसाळ (वय 33, रा. वाळवा, जिल्हा सांगली) यांची मठाधिपती म्हणून नियुक्ती केली.
या सगळ्या घडामोडीत हभप बंडातात्या कराडकर यांची भूमिका त्याच्या विरोधात होती, असा आरोप बाजीरावने पोलिस तपासात केला आहे. हभप बंडातात्या कराडकर वारकरी संप्रदायातील मोठे प्रस्थ आहे.
मला पुन्हा मठाधिपती करा, यासाठी त्याचा सतत अट्टाहास सुरू होता. मठाच्या सदस्याकडे जाऊन सतत धमक्या देण्याचे त्याचे सत्र सुरू असल्याने कराड पोलिसांनी बाजीरावला हद्दपार केले होते.
सोमवारी पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने बंडातात्या कराडकर आणि जयवंत पिसाळ हे दोघेही पंढरपूर मुक्कामी येणार हे बाजीराव जाणून होता.
ही संधी साधून बाजीरावने मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी मागितली. त्यावरून जयवंत महाराज आणि बाजीराव यांच्यात दशमीच्या दिवशी वाद झाला. पण काही मंडळींनी मध्यस्थी करून तो मिटवला. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बाजीरावने द्वादशीला दोघांचा काटा काढायचा असे ठरवून धार लावून चाकू तयार ठेवला होता. बंडातात्या द्वादशीला न थांबताच गेल्याने त्यांचा जीव वाचलादुपारची वेळ पाहून बाजीरावाने जयवंत महाराज यांच्या बरोबर भांडण उकरुन काढले आणि चाकूने जयवंत महाराजांच्या अंगावर सपासप वार केले हल्ला करत असताना कोणी सोडवायला येऊ नये यासाठी बाजीरावने खोलीला आतून कडी लावून घेतली होती.
या हल्ल्यानंतर बाजीराव पळून जाऊ नये म्हणून लोकांनी खोलीचा दरवाजा बाहेरुन कडी घालून बंद केला आणि बाजीराव पोलिसांच्या हाती रंगेहात सापडला.बुधवारी (दि. 8) न्यायालयासमोर आरोपीस हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी मठातील 10 ते 12 लोकांचे जबाब नोंदवले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.