36 जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर; मात्र, आव्हाडांसह या मंत्र्यांना 'पालकत्व' नाहीच

0 झुंजार झेप न्युज

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. 8 जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली असून या यादीत ठाकरे सरकारमधील सात मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या या यादीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. तर रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचीही कोणत्याच जिल्ह्यातील पालकमंत्रिपद मिळालेलं नाही
राज्यमंत्र्यांपैकी प्राजक्त तनपुरे, दत्तात्रय भरणे, राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ. विश्वजीत कदम, संजय बनसोडे यांनाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेलं नाही.
विशेष म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद मिळालेलं आहे. तसेच कोकणातील दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळालं आहे. यात सिंधुदुर्गाचे पालकमंत्रिपद उदय सामंत यांच्याकडे तर रत्नागिरीचे पालकमंत्रिपद अनिल दत्तात्रय परब यांना देण्यात आले आहे.

1.   पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
2.   मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
3.   मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे 
4.   ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5.   रायगड - कुमारी आदिती सुनिल तटकरे
6.   रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7.  सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
8.  पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
9.  नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10.धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
11.नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12.जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13.अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14.सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15.सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
16.सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17.कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18.औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
19.जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20.परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21.हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22.बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23.नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24.उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25.लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
26.अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27.अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28.वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29.बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30.यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
31.नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32.वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33.भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34.गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
35.चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36.गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे       

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.