शिवसेनेला पहिला धक्का, महाविकास आघाडी सरकारमधील पहिल्या मंत्र्याचा राजीनामा

0 झुंजार झेप न्युज

मुंबई प्रतिनिधी :
मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेकडून मंत्रिपद मिळाले औरंगाबादचे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले होते. परंतु , कोणीही विश्वासात न घेता हे मंत्रिपद दिले गेले अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. अब्दुल सत्तरांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र, राज्यमंत्री पद दिल्याने त्यांनी मंत्रिपदाचाच राजीनामा दिला आहे.
शिवसेनेकडून मात्र अब्दुल सत्तारांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांना पाठवले आहे. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते. अल्पसंख्याक समुहातून येऊन अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी सर्व जातीधर्मात आपले समर्थक निर्माण करून आपले राजकीय वर्चस्व कायम राखले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.