अमेरिकेचा बगदादवर दुसरा हवाई हल्ला, ६ जण ठार

0 झुंजार झेप न्युज

बगदाद - सलग दुसऱ्या दिवशी इराकवर अमेरिकेन लष्कराने एरिअल स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सहा जणांचा या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. शनिवारी बगदादजवळील ताजी रोजनजीक हा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी भारतीय वेळेनुसार हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटन आणि इटलीच्या सैन्याचे तळही या ठिकाणी असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दोन गाड्यांवर या हवाई हल्ल्यात निशाणा साधण्यात आला. इराण समर्थक मिलिशिया हश्‍द अल-शाबीचे काही लोक या गाड्यांमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. या गाडीतील सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांची ओळख पटली नसल्याचे इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हशद-अल-साबीच्या कमांडरला लक्ष्य करून अमेरिकेने हा हल्ला केला होता. या हल्ल्याच्या वृत्ताला इराकमधील सरकारी माध्यमांनीदेखील दुजोरा दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.