आजचा दिवस कसा जाईल? जाणून घ्या आजचं राशिभविष्य

0 झुंजार झेप न्युज

झुंजार झेप न्युज | ज्योतिषशास्त्र

▪  मेष - कुटुंब व काम आपले लक्ष वेधून घेत असल्याने आपण ह्या दोघांच्या कात्रीत सापडाल. मजा करण्यासाठी आपण संध्याकाळ राखून ठेवू शकाल. आपणास प्रसिद्धीची हौस असून लवकरच आपली हि इच्छा पूर्ण होणार आहे. आपणास पाठिंबा देण्यासाठी गणेशाचे आपणास आशीर्वाद आहेत.

  वृषभ - आज आपली जीवनशैली आरामदायी करण्याचा विचार केल्याने आपल्यातील स्पर्धात्मक जोश काहीसा सौम्य होताना दिसून येईल. दररोजच्या धावपळीचा आपणास कंटाळा येऊन त्यापासून दूर जावेसे आपणास वाटेल. घरातील काही प्रश्नांसाठी आपणास वेळ द्यावा लागेल असे गणेशास वाटते.

▪  मिथुन - आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. आपण आपली कारकीर्द किंवा कामापेक्षा आपल्या कुटुंबाकडे अधिक लक्ष द्याल. त्यामुळे घरातील काही प्रलंबित समस्यांचे व प्रकल्पांचे निराकरण होण्यास मदत होईल. आपली मुले व कुटुंबीय ह्यांच्या समवेत आनंदात वेळ घालविण्याचा हा दिवस असल्याचे गणेशा सांगत आहे.

▪  कर्क - नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्यास आजचा दिवस अनुकूल असल्याचे गणेशा सांगत आहे. लवकरच आपण नवीन घरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तेव्हा घरगुती सोहळ्याच्या तयारीस लागा. आपण योगासन व ध्यान - धारणा करून मनाचे स्थैर्य प्राप्त कराल. त्यामुळे आपल्यात नवीन ऊर्जा,उत्साह व आशावाद निर्माण होईल.

सिंह - क्वचितच कल्पकता एक विशिष्ट उंची गाठू शकते. आजच्या ह्या पवित्र दिवशी आपण आपली कल्पकता एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा प्रयत्न करा असे गणेशा आपणास सांगत आहे. विशेषतः जर आपण माध्यमांशी संबंधित असाल तर आपल्या योग्य कल्पनांना एक वेगळी उंची देण्याची हि एक उत्तम संधी आहे. एक लक्षात असू द्या कि आत्मविश्वास हि यशाची गुरुकिल्ली आहे असे गणेशा सांगत आहे.

कन्या - आज आपण आपल्या अंतःकरणात खोलवर बुडाल्याचे आपणास जाणवेल. आपणास बरीच आर्थिक बक्षिसे मिळतील व ती आपले जिवलग व प्रियजन ह्यांच्यावर खर्च करण्याची उदारता आपण दाखवाल. भौतिक सुखाने स्वतःचे मनोरंजन करून कामाच्या ठिकाणी येणाऱ्या दबावाचा सामना आपण करण्याची शक्यता असल्याचे गणेशा सांगत आहे. ज्याच्याशी आपण जिव्हाळ्याच्या गोष्टी करू शकाल अशा एखाद्या व्यक्तीच्या सहवासाचा आपण शोध घ्याल.

तूळ - आज आपल्या मित्रांऐवजी आपल्या प्रियव्यक्तीसह आपणास जास्त वेळ घालवायचा असेल असे गणेशा सांगत आहे. आजचा दिवस आपल्या मनातील भावना व्यक्त करून विविध संधी प्राप्त करण्यासाठी चांगला आहे. आपल्या प्रियव्यक्तीला मागणी घालून तिला सुखद आश्चर्याचा धक्का देण्यास आजचा दिवस चांगला आहे. गणेशाचा आपल्यावर नेहमीच आशिर्वादांचा वर्षाव होत असतो.

▪  वृश्चिक - आपण सांसारिक कार्यातून थोडे बाजूस होऊन स्वयंपाक व बागकाम ह्या सारखी काही सर्जनशील कार्य करण्याची शक्यता आहे. आज आपणास कठोर परिश्रमां ऐवजी कमी श्रमाची कामे करण्याची इच्छा होईल, असे गणेशा सांगत आहे. कामाच्या समाधानाची जागा कौटुंबिक सुख व आनंद घेईल.

▪  धनु - आज आपल्या प्रिय व्यक्ती कडून, त्यास आपली अत्यंत गरज भासल्याने, बोलावणे आल्यास त्याकडे जास्त लक्ष पुरवा. आज आपले काही कौटुंबिक मित्र जेवावयास किंवा रात्री भोजनास येतील तेव्हा हसत खेळत काही व्यवहार पूर्ण करा. आपल्या जोडीदारासह एकांतात गुजगोष्टी करण्यास गणेशा सांगत आहे.

▪  मकर - आजचा दिवस सुलभ असेल, परंतु एखाद्या घटनेने प्रभावित होऊन आपली सूड उगवण्याची भावना होऊ शकते, असे गणेशा सांगत आहे. अर्थात ह्याने वरिष्ठ व आपल्या बरोबरीच्या लोकात आपली प्रतिष्ठा डागाळणार नाही. आज आपले एखादे स्वप्न सत्यात उतरताना दिसेल, परंतु त्याने फुलून जाऊ नका, कारण सफलतेच्या मार्गात मागे काही ठेवून जाल. कामावर थोडे जास्त लक्ष केंद्रित केल्यास ध्येय नजरे समोर येऊन ठेपेल.

▪  कुंभ - घर किंवा वाहन खरेदीची स्वप्नपूर्ती होण्याचे चिन्ह दिसत आहे. नवी मालमत्ता बनविण्यास ग्रहमान अनुकूल आहे. तेव्हा त्यासाठीचे कागदपत्र गोळा करून कर्जाच्या तयारीस लागा. दिवसाची सांगता मंदिरात जाऊन करण्यास गणेशा सांगत आहे.

▪  मीन - काहीवेळा आपण इतके दयाळू व सेवाभावी होता कि इतरांच्या आनंदासाठी आपल्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करता. आपल्या निस्वार्थीपणामुळे हे घडत असते. आपले कुटुंब व आपले घर ह्यासाठी काहीतरी करण्याची आपली तीव्र इच्छा होईल. गणेशाच्या आशीर्वादाने कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही अवरोधा शिवाय आपण आपले ध्येय गाठू शकाल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.